शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

सांगलीचे सुधीर गाडगीळ २९ कोटींचे धनी

By admin | Updated: September 29, 2014 00:28 IST

सांगली विधानसभा : मदन पाटील, पृथ्वीराज पवार, सुरेश पाटीलही कोट्यधीश

सांगली : सांगली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजपचे धनंजय (सुधीर) गाडगीळ हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते २९ कोटींचे धनी आहेत. निवडणुकीत तुल्यबळ ठरणारे बहुतांश उमेदवार कोट्यधीशच आहेत. दिग्गज मंत्री, नेते आणि अन्य उमेदवारांची गर्दी सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या मैदानात झाली आहे. आर्थिक सक्षमतेच्या जोरावरही काहींनी शड्डू ठोकला आहे. दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सांगली विधानसभेतील उमेदवारांची संपत्ती किती आहे, याची माहिती प्रशासनाने वेबसाईटवर टाकली आहे. त्यानुसार सुधीर गाडगीळ, मदन पाटील, सुरेश पाटील, पृथ्वीराज पवार हे कोट्यधीश उमेदवारांच्या यादीत आहेत. भाजपचे गाडगीळ यांची जंगम मालमत्ता २३ कोटी ७३ लाख रुपये, तर स्थावर मालमत्ता ५ कोटी ३३ लाखांच्या घरात आहे. त्यांच्याकडे १ कोटी १५ लाखांची रोकड आहे. विविध बँकांमध्ये सुमारे पाच कोटीच्या ठेवी आहेत. ३ कोटी ९९ लाखांची शेअर गुंतवणूक असून, पोस्टात ८७ लाखांची ठेव आहे. जवळपास २३ कोटींचे सोने त्यांच्याकडे आहे. त्यांनी ६ कोटींचे कर्जही काढले आहे.काँग्रेसचे उमेदवार मदन पाटील यांची जंगम मालमत्ता ८१ लाखांची असून, स्थावर मालमत्ता ५ कोटी २ लाखांची आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ४२ लाखांची जंगम, तर २ कोटी ३७ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबाकडे ३८० ग्रॅम सोने, तर ४२० ग्रॅम चांदी आहे. विविध कंपन्यांच्या चारचाकी व दुचाकी त्यांच्याकडे आहेत. विविध बँकांमध्ये त्यांच्या सुमारे वीस लाखांच्या ठेवी आहेत. पद्माळे, कवलापूर, मालगाव, बेडग येथे त्यांच्या नावावर जमिनी आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील यांची जंगम मालमत्ता ४ कोटी ५५ लाख असून, त्यांच्या पत्नीच्या नावे ४ कोटी ४४ लाखांची जंगम मालमत्ता आहे. त्याचबरोबर त्यांची स्थावर मालमत्ता ४६ लाख ५० हजारांची आहे. जवळपास चार कोटींची त्यांची गुंतवणूक आहे. त्यांच्या कुटुंबाकडे ५१० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. सांगली, सौदी (ता. अथणी) येथे त्यांच्या नावावर जमीन आहे. विविध बँकांचे त्यांच्यावर ३ कोटी ५३ लाखांचे कर्जही आहे.शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज पवार यांची जंगम मालमत्ता ३ लाख २४ हजार असून, स्थावर मालमत्ता ७४ लाख ७७ हजार आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे स्थावर मालमत्ता ७० लाखांची आहे. त्यांची सर्वोदय कारखाना, डेअरी आदी ठिकाणी गुंतवणूक आहे. त्यांच्यावर ४ लाख ६४ हजारांचे कर्जही आहे. (प्रतिनिधी)