शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या सुपुत्राची अमेरिकेतील सर्वोच्च शिखरावर चढाई, प्राणवायूची उपलब्धता ५० टक्केच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:02 IST

संभाजी गुरव पुण्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून काम करतात. गिर्यारोहणात आजवर अनेक विक्रम केले आहेत

सांगली : जगातील सात खंडांतील सातही सर्वोच्च शिखरे वर्षभरात सर करण्याचा निर्धार केलेल्या संभाजी गुरव यांनी विक्रमाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. रविवारी (दि. २२) दक्षिण अमेरिका खंडातील अँडिज पर्वत रांगेतील सर्वोच्च माउंट अकानकागुआ सर केले. त्यांनी सर केलेले हे पाचवे शिखर आहे.पडवळवाडी (ता. वाळवा) येथील रहिवासी असणारे संभाजी गुरव पुण्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून काम करतात. गिर्यारोहणात आजवर अनेक विक्रम केले आहेत. दोन दिवसांपूर्वी सेव्हन समिटमधील एव्हरेस्टनंतरचे सर्वोच्च अकानकागुआ शिखर सर केले. मोहिमेत त्यांच्यासोबत स्वित्झर्लंड, अमेरिका, फिनलंड, पनामा, अर्जेंटिना आदी देशांतील गिर्यारोहक होते.१३ जानेवारीस कॅनफ्लूएन्सिया येथे मुक्काम केला. रात्री दहा वाजले तरी सूर्य तळपत होता. १४ जानेवारीस रंगीत तालमीसाठी ४३०० मीटर उंचीवरील प्लाझा दी फ्रान्सिया येथे चढाई केली. १७ जानेवारीस बेस कॅम्पवरून पाठीवर १५ किलो वजनासह ११०० मीटर उंचावरील कॅंप दोनवर पोहोचले.२० जानेवारीस तेथूनच थेट चढाई करण्यास सुरूवात केली. २२ जानेवारीस पहाटे गोठविणाऱ्या थंडीत निर्णायक चढाई सुरू झाली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शिखर माथ्यावर त्यांनी  पाऊल ठेवले. गुरव म्हणाले की, हा पर्वत या काळात कोरडा असतो; पण आम्हाला बर्फवृष्टीचा सामना करावा लागला. तापमान उणे २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. पर्वत दोन महासागरांमध्ये असल्याने जोराचा वारा होता. प्राणवायूची उपलब्धता ५० टक्केच होती.या मोहिमेसाठी पोलिस महासंचालक संजयकुमार, आयुक्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त जालिंदर सुपेकर, पुणे शहर उपायुक्त आर. राजा यांनी पाठबळ दिल्याचे गुरव यांनी सांगितले.असा झाला विक्रमाकडे प्रवास२३ मे २०२१ रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले होते. त्यानंतर सातही खंडांतील सात सर्वोच्च शिखरे एका वर्षात पायाखाली घेण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यानुसार २६ जुलै २०२१ रोजी युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस सर केले.१५ ऑगस्ट २०२१ रोजी आफ्रिका खंडातील माउंट किलीमांजारोवर तिरंगा फडकविला. २९ सप्टेंबर २०२२ रोजी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च माउंट कोजीअस्कोवर चढाई यशस्वी केली. त्यानंतर अमेरिकेतील २३ हजार फूट उंचीचे माउंट अकानकागुआ सर करून विक्रमाचा पाचवा टप्पा पूर्ण केला.

टॅग्स :Sangliसांगली