शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

सांगलीच्या पोलीस मुख्यालयातच वाढली अभय कुरुंदकर-अश्विनी बिद्रे यांची जवळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:10 AM

सांगली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या बेपत्ताप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आल्यानंतर सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे

ठळक मुद्देसांगली पोलिसांच्या कृत्याची पुन्हा एकदा राज्यभर चर्चा सुरु एलसीबीच्या कार्यालयात अनेकदा कुरुंदकर व अश्विनी बिद्रे बोलत बसलेले असत.

सांगली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या बेपत्ताप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आल्यानंतर सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अभय कुरुंदकर व अश्विनी बिद्रे दोघेही काही वर्षांपूर्वी पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. यादरम्यानच दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती.आजरा (जि. कोल्हापूर) येथील अभय कुरुंदकरची २००८ मध्ये सांगलीला सहायक पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली. एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याचा कार्यभार त्याच्याकडे सोपविण्यात आला होता. नंतर सांगलीतच त्याची पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. कुपवाड पोलीस ठाण्यातून त्याची पोलीस मुख्यालयात बदली झाली. आर्थिक गुन्हे शाखेचा काही महिने कार्यभार सांभाळल्यानंतर त्याच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाची जबाबदारी आली. त्यावेळी एलसीबीचे कार्यालय पोलीस मुख्यालयातच होते.आळते (जि. कोल्हापूर) येथील बिद्रे-गोरे २००६ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलातील सेवेत रुजू झाल्या. त्यांची पहिली नियुक्ती पुण्यात झाली. पुण्यातील कार्यकाल संपल्यानंतर त्यांची सांगलीला बदली झाली. सांगलीत पोलीस मुख्यालयात काही महिने सेवा बजावल्यानंतर त्यांची एलसीबीत बदली झाली. येथे कुरुंदकर त्यांचा वरिष्ठ होता. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांच्यात चांगली ओळख होऊन जवळीकता वाढत गेली. सुरुवातीला सहा महिने अश्विनी आळतेहून जाऊन-येऊन नोकरी करीत होत्या. पण त्यानंतर कुरुंदकरने त्यांना येथील यशवंतनगर येथे राजकीय कार्यकर्त्यांचा फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता, अशी आता चर्चा सुरू आहे. कुरुंदकरही विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयाजवळ भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता. कुरुंदकरने कधीही पोलीस दलाची वाहने वापरली नाहीत. तो स्वत:च्या खासगी मोटारीनेच कार्यालयात येत असे. एलसीबीच्या कार्यालयात अनेकदा कुरुंदकर व अश्विनी बिद्रे बोलत बसलेले असत. दोघांतील जवळीकतेबद्दल पोलीस दलात उलट-सुलट चर्चा सुरू असे.

वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना याची दखल घेऊन बिद्रे यांची महिला कक्षात बदली करावी लागली होती. त्यांची २०१३ मध्ये सांगलीतून रत्नागिरीला बदली झाली. त्यांच्यापाठोपाठ कुरुंदकरचीही पालघर जिल्ह्यात बदली झाली. सांगली जिल्ह्यात तीन वर्षे एलसीबीचा कार्यभार सांभाळणारा तो जिल्ह्यातील पहिलाच अधिकारी ठरला. पालघर जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या नवघर पोलीस ठाण्याचा कार्यभार त्याच्याकडे सोपविला होता. त्यानंतर दीड वर्षानंतर त्याची ठाणे एलसीबीत बदली झाली. अश्विनी बिद्रे यांचीही २०१६ मध्ये रत्नागिरीहून ठाणे जिल्ह्यात कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यामुळे पुन्हा कुरुंदकर व अश्विनी बिद्रे यांची भेट झाली. तत्पूर्वी कुरुंदकर रत्नागिरी येथेही अश्विनी यांना भेटायला जात होता, अशी माहिती पुढे येत आहेसांगली पुन्हा राज्यभर चर्चेतवारणानगर (जि. कोल्हापूर) येथे सव्वानऊ कोटी रुपयांच्या रकमेवर ‘डल्ला’ मारल्याप्रकरणी सांगलीचा एलसीबी विभाग राज्यभर चर्चेत आला. हे प्रकरण शांत होते, तोपर्यंत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत लुटमारीच्या गुन्ह्यातील संशयित अनिकेत कोथळेचा पोलिसांनीच खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जाळला. या घटनेला एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असतानाच सांगली पोलीस दलात सेवा बजावलेल्या अभय कुरुंदकरला अश्विनी बिद्रे यांचे अपहरण व हत्या केल्याच्या संशयावरुन अटक झाली आहे. त्यामुळे सांगली पोलिसांच्या कृत्याची पुन्हा एकदा राज्यभर चर्चा सुरु झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली