शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

​राम कदम यांच्याविरुद्ध सांगलीत विनयभंगाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:47 IST

तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली.

सांगली : तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली. याबाबतची रितसर तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विनया पाठक, नगरसेविका संगीता हारगे, राधिका हारगे, आयेशा शेख, स्वाती पारधी, सुनीता लालवाणी, छाया मोरे आदींनी हे निवेदन विश्रामबाग पोलीस निरीक्षक अशोक तनपुरे यांना दिले. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.  तक्रारीत म्हटले आहे की, राम कदम यांनी ४ सप्टेंबर रोजी मुंबईतील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात, तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्याचे वक्तव्य जाहीररीत्या केले. या माध्यमातून त्यांनी राज्यातील तमाम महिला वर्गाचा विनयभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विनया पाठक म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविताना, परस्त्री मातेसमान, ही शिकवण दिली. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर महाराष्ट्र वाटचाल करीत असताना, सरकारमधील एक आमदार शिवरायांच्या याच तत्त्वाला काळिमा फासण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक मुलींना पळवून आणण्याची धमकी देऊन एक प्रकारे सर्व महिला वर्गाचा विनयभंगच त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचीच तक्रार दाखल करण्यात यायला हवी.सत्ताधारी आमदार म्हणून अशा लोकांना पाठीशी घातले जाणार, की महिला वर्गाचा मान राखला जाणार, हे लवकरच जनतेला कळेल. सरकार खरेच महिलांच्या बाजूने असेल, तर ते अशा आमदारावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना सूचना देईल. आम्ही या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. जर सरकारने राम कदम यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यानंतर उद्भवणा-या परिस्थितीस पोलीस जबाबदार राहतील, असेही पाठक म्हणाल्या.