शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली, विविध संघटनांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:58 IST

लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्देसांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली, विविध संघटनांचा सहभाग आ. ह. साळुंखे अमृतमहोत्सवी सत्कार समितीतर्फे कार्यक्रम

सांगली : लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने रविवारी सांगलीत विचारदर्शन प्रबोधन रॅली काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.रविवारी सकाळी ११ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा येथून रॅलीस सुरुवात झाली. हौसाताई पाटील, शांताबाई कराडकर आणि प्रमिला लाड यांच्याहस्ते प्रबोधन मशाल पेटवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे, अ‍ॅड. के. डी. शिंदे, नामदेव करगणे, सुभाषराव पाटील, व्ही. वाय. पाटील, अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, अ‍ॅड. तेजस्वीनी सूर्यवंशी, संपतराव गायकवाड, कॉ. शंकर पुजारी, कॉ. सुमन पुजारी, नितिन चव्हाण, डॉ. संजय पाटील, आशा पाटील, शाहिन शेख, सुनील गुरव आदी उपस्थित होते.

रॅलीमध्ये ढोल, झांजपथक, हलगी व जिवंत देखावे सहभागी झाले होते. मराठा सेवा संघ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, राष्टसेवा दल, संभाजी ब्रिगेड प्रवासी संघटना, सांगली जिल्हा प्रवासी संघटना, नरवीर उमाजी नाईक ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांच्यासह विविध सामाजिक व पुरोगामी संघटना सहभागी झाल्या होत्या. अग्रभागी रथ आणि त्यामागे सजविलेली वाहने होती. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते रॅलीत लक्षवेधी ठरले.भगवे फेटे, पांढरा कुर्ता-पायजमा घालून कार्यकर्ते उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांची छायाचित्रे तसेच आ. ह. साळुंखे यांच्या विविध पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे फलकही वाहनांवर लावण्यात आले होते. विश्रामबाग, मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर चौक, पंचमुखी मारुती रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याजवळ रॅली आली. याठिकाणी शिवरायांना अभिवादन करून रॅली स्टेशन चौकमार्गे आमराई येथील हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे यांच्या पुतळ््यास अभिवादन करून शांतिनिकेतन येथे आली. याठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Sangliसांगली