शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सांगलीत ‘एका मिनिटात ज्ञानेश्वरी’

By admin | Updated: August 24, 2016 23:44 IST

सांगली शिक्षण संस्थेचा उपक्रम : ९ हजार ७३७ विद्यार्थ्यांचा सहभाग

सांगली : ‘बोला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ अशा जयघोषात येथील सांगली शिक्षण संस्थेच्यावतीने ‘एक तरी ओवी... एका मिनिटात संपूर्ण ज्ञानेश्वरी...’ हा उपक्रम बुधवारी पार पडला. या उपक्रमाची सुरुवात १४ जुलैला करण्यात आली होती, तर याची सांगता बुधवारी झाली. संस्थेने पुरविलेल्या कागदावर ९ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी एकाचवेळी एका मिनिटात एक ओवी लिहून विक्रम प्रस्थापित केला. ज्ञानेश्वरीस नुकतीच ७२५ वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधत इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या ९ हजार ७३७ विद्यार्थ्यांना सहभागी करून यापूर्वी कधीही न झालेला ‘एक तरी ओवी... एका मिनिटात संपूर्ण ज्ञानेश्वरी...’ उपक्रम राबविण्यात आला. १४ जुलैला एक ओवी ठळक दिसणारी आणि सुलेखन वहीप्रमाणे नऊ ओव्या असलेली बत्तीस पानांची वही आणि जेल पेन विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत देण्यात आले होते. त्यामार्फत एका मिनिटात एक ओवी गिरवण्याचा सराव झाला होता. बुधवारी संस्थेच्या २३ शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकाचवेळी सकाळी ८.३९ ते ८.४० या वेळेत एका मिनिटात एक ओवी लिहिली आणि एका मिनिटात ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. त्यानंतर ८.४२ ते ८.४३ या वेळेत पुन्हा ज्ञानेश्वरीची दुसरी प्रत पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या संपूर्ण ज्ञानेश्वरीची एक प्रत आळंदी येथे ज्ञानेश्वरांच्या चरणी संस्थेच्यावतीने अर्पण करण्यात येणार असून, दुसरी प्रत संस्थेकडे संग्रही ठेवण्यात येणार आहे. हा उपक्रम ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत, संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर, उपाध्यक्ष जनार्दन लिमये, कार्यवाह शशिकांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्ण करण्यात आला. यावेळी नीना राऊत, संचालक अरविंद मराठे, विजय भिडे, श्रीराम कुलकर्णी, अरुण दांडेकर, अनिता कुलकर्णी, अनघा कुलकर्णी, केदार रसाळ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)