सांगली : भारताविरोधात कुरघोड्या करणाऱ्या चीनच्या वस्तूंवर सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन करीत गुरुवारी सांगली शहर शिवसेनेच्यावतीने कॅँडल मार्च काढण्यात आला. पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी चायनीज वस्तूंवर बहिष्काराचे फलक आंदोलनकर्त्यांनी झळकविले होते. चायनीज वस्तू वापरू नका, चायनीज वस्तू विकू नका, खरेदी करू नका आणि भारतविरोधी कुरापती करणाऱ्या चायनाचे खिसे भरू नका, असे आवाहन करणारी पत्रकेही वाटण्यात आली. सांगलीच्या मारुती चौकात कॅँडल मार्च आल्यानंतर निदर्शने करण्यात आली. चीनच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. स्वदेशीचा नारा देण्यात आला. आंदोलनात निलेश हिंगमिरे, कुलदीप यादव, रेखा पाटील, आदित्य विचारे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
सांगलीत चायनीज वस्तूंविरोधी कॅँडल मार्च
By admin | Updated: October 7, 2016 00:08 IST