शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत संविधान सन्मान मोर्चा जिल्हाभरातून प्रतिसाद : संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:25 IST

‘तिरंगा आमची शान आहे, भारतीय राज्यघटना जनतेचा सन्मान आहे’, ‘संविधान हमारा जानसे प्यारा, यही है भारत का नारा’, अशा लक्षवेधी घोषणांचे फलक घेऊन सहभागी झालेले तरुण आणि भारतीय संविधानाचे स्थान अधिक प्रबळ करणाºया घोषणा देणाºया

सांगली : ‘तिरंगा आमची शान आहे, भारतीय राज्यघटना जनतेचा सन्मान आहे’, ‘संविधान हमारा जानसे प्यारा, यही है भारत का नारा’, अशा लक्षवेधी घोषणांचे फलक घेऊन सहभागी झालेले तरुण आणि भारतीय संविधानाचे स्थान अधिक प्रबळ करणाऱ्या घोषणा देणाऱ्या नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सांगलीत सोमवारी संविधान सन्मान मोर्चा निघाला. जिल्हाभरातून आलेले संविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारतीय संविधान देशाचा प्राण असताना, ते जाळून अपमान करणाऱ्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने करण्यात आली. भाजप वगळता इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सोमवारी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या सर्वात पुढे तरुणांच्या हाती भव्य राष्ट्रध्वज होता. तिरंग्यातील रंगाच्या टोप्या घातलेले नागरिक संविधान सन्मानाच्या घोषणा देत सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर तेथे राणी यादव यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. त्यानंतर प्रतीक्षा कोरी, रहिस्मा मुल्ला, आश्लेषा कुरुंदवाडे, माधुरी कचरे आणि कोमल मगदूम या पाच तरुणींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन सादर केले.

यावेळी डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, गौतमीपुत्र कांबळे, अ‍ॅड. के. डी. शिंदे, आशिष कोरी, अमर पांडे, अ‍ॅड. अमित शिंदे, महेश खराडे, रवींद्र ढाले, सचिन सवाखंडे, ज्योती आदाटे, महेश माने, मुनीर मुल्ला, नितीन कांबळे, सदाशिव मगदूम, सुरेश दुधगावकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.पक्षांकडून संविधानाला धोकाराष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही ही सर्वात आधुनिक समाजव्यवस्था आहे. लोकशाहीविरोधी संस्था, संघटना व पक्षांनी संविधान मोडून काढायला सुरूवात केली आहे. दिल्लीमध्ये काही संघटना नियोजनपूर्वक संविधान जाळतात व पोलीस त्याचे छायाचित्रण करतात. वास्तविक तेथे उपस्थित असणाºया पोलिसांनी तेथेच त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. हे सत्ताधाऱ्यांचे लोकशाहीविरोधी भयंकर षड्यंत्र आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून मनुस्मृती समर्थकांचा व सनातनी लोकांचा संविधानास विरोध राहिला आहे. आता केंद्रात व राज्यात त्यांचेच सरकार असल्यामुळे संविधानिक व्यवस्था मोडीत काढली जात आहे. त्यामुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे.नेत्यांचा सहभाग...या मोर्चात विविध सामाजिक संघटनांबरोबरच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. खा. राजू शेट्टी, आ. सुमनताई पाटील, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह पदाधिकाºयांचा समावेश होता.प्रमुख मागण्या...संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करा.संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.गुन्हा घडताना बघ्याची भूमिका घेणाºया पोलिसांवरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा.शालेय अभ्यासक्रमात राज्यघटनेचा समावेश करा.संविधान दिवस शासकीय स्तरावर साजरा करावा.