शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

सांगली जिल्हा परिषद भरतीत वेळापत्रकाअभावी उमेदवारांचा जीव टांगणीला, नियोजित परीक्षा तात्पुरती स्थगित

By अशोक डोंबाळे | Updated: October 23, 2023 17:29 IST

नियोजित वेळापत्रकातील परीक्षा दोनवेळा

सांगली : जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या भरतीला लागलेले ग्रहण काही सुटताना दिसत नाही. दुसऱ्यांदा परीक्षेचे वेळापत्रक रद्द झाल्याने इच्छुक उमेदवारांत संभ्रमावस्था आहे. नियोजित परीक्षा स्थगित केली आहे. परीक्षा कधी सुरू होणार, याची कल्पना परीक्षा घेत असलेल्या कंपनीने प्रशासनाला दिली नाही. कंपनीच्या या भूमिकेमुळे परीक्षा कधी होणार, या विचाराने परीक्षार्थींचा जीव टांगणीला लागला आहे.जिल्हा परिषद वर्ग तीनमधील रिक्त ७५४ पदांच्या भरतीसाठी जिल्ह्यात ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली. प्रारंभी ही परीक्षा ऑक्टोबरपासून होणार होती; परंतु तयारी नसल्याचे कारण देत ७ ऑक्टोबरपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ७ ते ११ अशा चार दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले. यात केवळ आठ संवर्गातील परीक्षा झाली. तोपर्यंत पुढील वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते. अखेर दुसऱ्या टप्प्यातील १६ ते २२ ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले. यातील १७ ऑक्टोबरपर्यंत ६ संवर्गाकरिता परीक्षा घेतली; परंतु आता जवळपास अर्ध्या संवर्गाची परीक्षा झाली नसताना अचानक परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे परीक्षार्थी असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उर्वरित संवर्गासाठीची परीक्षा पुढे ढकलण्यामागे तांत्रिक कारण असल्याचे प्रशासनाने सांगितले. तिसऱ्या टप्प्यात विविध संवर्गाच्या रिक्त पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचे अद्याप वेळापत्रक जाहीर झाले नाही. तूर्तास या पदाची परीक्षा पुढे ढकलल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहे; मात्र नेमकी ज्या संवर्गाची परीक्षा अद्याप झाली नाही. ती केव्हा होईल याबाबतचे काहीही ठावठिकाणा नाही. परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या या भूमिकेमुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे जिल्हा परिषद आणि शासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.अजून ५० टक्के भरती बाकीआतापर्यंत १४ संवर्गातील परीक्षा झाली असून १६ संवर्गाची म्हणजे ५० टक्के भरती बाकी आहे. यात मुख्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कनिष्ठ सहायक अशा मोठ्या पदांचे संवर्ग बाकी आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती होण्यास अजून किती दिवस लागणार, याची धास्ती अर्ज केलेल्या उमेदवारांना लागली आहे. 

तिसऱ्या टप्प्यात ज्या पदासाठी परीक्षा होणार आहे. त्याचे अद्याप वेळापत्रक मिळाले नाही. संबंधित कंपनीकडून पुढील वेळापत्रक जाहीर होताच उर्वरित संवर्गातील पदांच्या परीक्षा होतील. - प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद