शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By अशोक डोंबाळे | Updated: June 12, 2025 19:39 IST

साठ गटानुसार होणार रचना : फेर आरक्षण सोडत काढावी लागणार

अशोक डोंबाळेसांगली : गेल्या तीन वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर राज्य शासनाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषद गट आणि गण निश्चितीसाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली चालू आहेत. जिल्ह्यात वाढलेल्या नगरपालिका संख्या लक्षात घेतल्यास जिल्हा परिषद गट ६० आणि गण १२० होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे.

ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पूर्व तयारी आढावा बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. या बैठकीमध्ये निवडणुकीचा आढावा घेतला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्या विचारात घेऊन गट व गणाची निश्चिती करण्यात येणार आहे. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायतींची लोकसंख्या वगळण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद गटाची रचना करताना सदस्य संख्या यांचे प्रमाण कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ अशी संख्या निश्चित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.या सूत्राचा विचार केल्यास सांगली जिल्हा परिषदेत ६० जिल्हा परिषद आणि १२० पंचायत समित्यांचे गण होण्याची शक्यता आहे. या लोकसंख्येनुसार जिल्हा परिषद गट आणि गणाची रचना करण्यात जिल्हा प्रशासन व्यस्त आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद गट आणि गण रचनेचा आराखडा पूर्ण तयार केला आहे. पण, राज्य शासनाकडून गट आणि गणाबाबत अधिकृत आदेश नसल्यामुळे पुढील कामकाज थांबल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ग्रामविकासचे प्रधान सचिव म्हणतात..

  • प्रभाग संख्या निश्चित करताना प्रत्येक पंचायत समिती स्तरावर जिल्हा परिषदेचे असलेल्या निवडणूक विभाग व त्या प्रमाणात पंचायत समितीचे प्रत्येक निवडणूक विभागाचे दोन निर्वाचक गणात विभाजन असावे.
  • निवडणूक विभाग, निर्वाचन गणाची रचना करीत असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीची एकूण लोकसंख्या भागिले त्या गट आणि गणास देय असलेली एकूण सदस्य संख्या या सूत्रानुसार निवडणूक जिल्हा परिषद गट व गणाची सदस्य संख्या निश्चित करा.
  • जिल्हा परिषद गट व गणाची सरासरी लोकसंख्या १० टक्के कमी किंवा १० टक्के जास्त ठेवता येईल.
  • गट आणि गण रचना करताना त्याची सुरुवात उत्तर दिशेकडून करून, उत्तरेकडून-ईशान्येकडे, त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकावे व शेवट दक्षिणेत करावा. गट व गण यांचे क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत.
  • रचना करताना भौगोलिक सलगता राहिली पाहिजे.
  • जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची रचना करताना गुगल मॅप नकाशे तयार करा.
  • जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण हद्दी काळ्या रंगाच्या ठिपक्यांनी चिन्हांकित करा. प्रत्येक ग्रामपंचायतीचे नाव, लोकसंख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लोकसंख्येची नोंद घ्या.