शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मला माफ करा’, अशी विनंतीही त्याने केली--सांगलीत तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:30 IST

येथील राममंदिर चौकातील ‘बेल्झ केक शॉप’मध्ये पन्नास हजाराची रोकड चोरी केल्याचा पश्चाताप झाल्याने शुभम नामदेव व्हनखंडे (वय १८, रा. हरिपूर रस्ता, पाटणे प्लॉट, सांगली) याने राहत्या घरी गळफास

ठळक मुद्देकेक शॉपीतील प्रकरण : आत्महत्येपूर्वी मालकांना उद्देशून चिठ्ठी

सांगली : येथील राममंदिर चौकातील ‘बेल्झ केक शॉप’मध्ये पन्नास हजाराची रोकड चोरी केल्याचा पश्चाताप झाल्याने शुभम नामदेव व्हनखंडे (वय १८, रा. हरिपूर रस्ता, पाटणे प्लॉट, सांगली) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवार दि. ७ नोव्हेंबरला ही घटना घडली. घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.

शुभम व्हनखंडे हा बेल्झ केक शॉपमध्ये कामाला होता. ३१ आॅक्टोबरला मध्यरात्री चोरट्यांनी केक शॉपी फोडून पन्नास हजाराची रोकड व सीटीटीव्ही कॅमेरा लंपास केला होता. शॉपचे मालक अनुप गांधी यांनी १ नोव्हेंबरला विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. बुधवारी पोलिसांनी शॉपमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरु ठेवली होती. यावेळी शुभमचीही चौकशी झाली होती. त्याला पुन्हा गुरुवारी चौकशीसाठी बोलाविले होते. तेव्हापासून तो तणावाखाली होता. घरी गेल्यानंतर त्याने, शॉपमध्ये ‘मीच चोरी केली आहे’, असे सांगितले.

हे ऐकून घरच्यांना धक्का बसला. घरचे लोक शॉपचे मालक गांधी यांना भेटून, त्यांची माफी मागण्यासाठी व पैसे परत करतो, हे सांगण्यासाठी गेले. त्यावेळी शुभमने राहत्या घरी साडीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घरचे लोक गांधी यांना भेटून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याने आत्महत्या केल्याचे पाहून संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला.मालकाची माफीआत्महत्या करण्यापूर्वी शुभमने मालक गांधी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून, ‘दुकानात मीच चोरी केली आहे’, अशी कबुली दिली. तसेच ‘मला पैशाची खूप अडचण होती, यासाठी मी दुकानातील पन्नास हजाराची रोकड लंपास केली आहे, मला माफ करा’, अशी विनंतीही त्याने केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीतही असाच मजकूर आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी