शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या स्वच्छता अभियानाचा जागतिक विक्रम, इंडिया वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र 

By अविनाश कोळी | Updated: October 21, 2023 12:37 IST

दोन हजार दिवस अखंडित मोहीम, कोणत्याही शासकीय मदतीशिवाय दड्डणावर व त्यांच्या ग्रुपने गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले

सांगली : तब्बल २ हजार दिवस अखंडित स्वच्छता अभियान राबविण्याची किमया करणाऱ्या सांगलीच्या निर्धार फाऊंडेशनची दखल इंडियाज् वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेत त्यांचा जागतिक विश्वविक्रम नोंदविला. संघटनेचे प्रमुख राकेश दड्डणावर यांच्या नावे या विक्रमाची नोंद झाली आहे.फाऊंडेशनमार्फत दड्डणावर यांनी १ मे २०१८ रोजी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. नागरिकांना सुरुवातीला ही औपचारिकता वाटली, पण शहरातील अनेक भागांचे रुपडे बदलू लागले तेव्हा अनेक तरुण, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी त्यांच्या अभियानात सहभागी झाले. अभियानाची व्यापकता वाढत गेली. सुरुवातीला शहरापुरती मर्यादीत असणारी ही मोहीम शहरालगतच्या गावांमध्ये पोहचली. नंतर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही तिचा डंका वाजला.आषाढी एकादशीनंतर पंढरपूरच्या मंदिर परिसरासह संपूर्ण घाट या फाऊंडेशनने चकाचक केला. त्यानंतर राज्यभरातील युवक या अभियानाशी जोडले गेले. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय दड्डणावर व त्यांच्या ग्रुपने गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले. १ मे २०१८ रोजी त्यांनी हाती घेतलेला झाडू आजही त्यांच्या हाती टिकलेला आहे. एक दिवसाचाही खंड न पाडता या तरुणांनी मोहीम राबविली. अभियानास नुकतेच २ हजार दिवस पूर्ण झाले आणि त्याचवेळी जागतिक विक्रमाची नोंद झाल्याची बातमीही फाऊंडेशनला मिळाली.

टॅग्स :Sangliसांगली