शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीला ‘यलो सिटी’ बनविणार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 17:50 IST

सांगलीची हळद देशासह परदेशातही जाते. त्यामुळे शहरातील शासकीय इमारतींना हळदीचा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली : सांगलीच्या हळदीचे देश आणि राज्यस्तरावर ब्रॅण्डिंग व्हावे, यासाठी शहराला ‘यलो सिटी’ बनविण्याचा निर्धार महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. इंजिनिअर अँड आर्किटेक्ट सभागृहात यलो सिटीबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यलो सिटीच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.या चर्चासत्राला उपमहापौर उमेश पाटील, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, आभाळमाया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद चौगुले, आर्किटेक्ट प्रमोद परिख, क्रेडाईचे अध्यक्ष रवींद्र खिलारे, राज्य उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. प्रमोद चौगुले यांनी देश, विदेशातील यलो सिटीची माहिती देत सादरीकरण केले.आयुक्त कापडणीस यांनी सांगली यलो सिटीमागील उद्देश सांगितला. सांगलीची हळद देशासह परदेशातही जाते. त्यामुळे शहरातील शासकीय इमारतींना हळदीचा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे. हळदीच्या ब्रँडिंगसाठी आणि हळदीला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करीत आहोत. पहिल्या टप्प्यात महापालिकेची सर्व कार्यालये दर्शनी बाजूंनी पिवळ्या रंगात रंगविली जाईल. त्यानंतर महापालिकेच्या शाळा, चौक, शहरात येणारे मार्ग,  सार्वजनिक भिंती, जुन्या  इमारतींनाही पिवळा रंग दिला जाईल. सांगलीकर जनतेनेही प्रत्येक घराची दर्शनी बाजू पिवळ्या रंगाने रंगवावी. सांगली हे देशातील आठवे यलो शहर म्हणून अस्तित्वात येणार आहे. त्यातून शहराची जागतिक ओळखही निर्माण होणार  असल्याचे सांगितले.यावेळी नगरसेवक विष्णू माने, अभिजित भोसले, नगरसेवक योगेंद्र थोरात, गोपाळ मर्दा, चेंबरचे अध्यक्ष शरद शहा यांनी मते मांडली.चर्चासत्रास नगरसेवक शेखर इनामदार,  संजय कुलकर्णी, हरिदास पाटील,  अतिरिक्त आयुक्त संजीव ओव्होळ, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी विजय पवार, शहर अभियंता परमेश्वर हलकुडे, डॉ. दिलीप पटवर्धन उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली