शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने भोसकून खून,कर्नाटकातील संशयित पसार

By शरद जाधव | Updated: October 27, 2023 21:58 IST

Crime: सांगली शहरातील वानलेसवाडी परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेदम मारहाण करत चाकूने निर्घृण खून केल्याची शिल्पा सदाप्पा कटीमणी असे मृत महिलेचे नाव आहे.

- शरद जाधव सांगली  -शहरातील वानलेसवाडी परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेदम मारहाण करत चाकूने निर्घृण खून केल्याची शिल्पा सदाप्पा कटीमणी (वय २५ रा. कक्केरी जि. यातगिरी, कर्नाटक) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत शिल्पा यांच्या आई मंजुळा उर्फ लक्ष्मीबाई शिवरुद्र दोड्डमणी (रा. मूळ तळवारगीर कर्नाटक, सध्या वानलेसवाडी, सांगली) संशयित सिदाप्पा नागाप्पा कटीमणी (वय ३० रा. कक्केरी जि. यातगिरी कर्नाटक) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. खूनानंतर संशयित सिदाप्पा हा पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत शिल्पा कटीमणी यांचा विवाह कक्केरीमध्ये राहणाऱ्या संशयित सिदाप्पा कटीमणी याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर संशयित सिदाप्पा हा वारंवार शिल्पावर संशय घेत होता. दारूच्या नशेत तो वारंवार मारहाण करत असे. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिल्पा सांगलीतील वानलेसवाडी येथे बांधकामावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या आईकडे आल्या होत्या.

गुरूवारी संशयित सिदाप्पा हा पत्नी शिल्पाला घेऊन जाण्यासाठी वानलेसवाडीत घरी आला. यावेळी शिल्पा यांनी त्याच्याबरोबर जाण्यास नकार दिला. या रागातून त्याने शिल्पाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी संशयिताने शिल्पावर चाकूने चार वार केले. पोटात चाकूचा वर्मी घाव बसल्याने त्या कोसळल्या शिल्पा यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याने तेथून पळ काढला. चाकूचा वर्मी घाव बसल्याने शिल्पा यांचा जागीच मृत्यू झाला.

विश्रामबाग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शिल्पा यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मिरजचे पोलीस उपअधीक्षक प्राणिल गिल्डा यांनी घटनास्थळाची भेट देत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. घटनेनंतर संशयित सिदाप्पा हा पसार झाला असून, विश्रामबाग पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी कर्नाटकात रवाना झाली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी