कडेगाव : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, काँगेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ . विश्वजित कदम यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांचे सुपुत्र डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार निरंजन डावखरे, खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, विजयमाला कदम, स्वप्नाली विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कडेगाव यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यलयात गर्दी केली होती.या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे भाजप या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार न देता, ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती आम्ही करणार आहोत, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
सांगली : पोटनिवडणुकीसाठी विश्वजीत कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 17:01 IST
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, काँगेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ . विश्वजित कदम यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांचे सुपुत्र डॉ. विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सांगली : पोटनिवडणुकीसाठी विश्वजीत कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल
ठळक मुद्देपलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी विश्वजीत कदम यांचा अर्जदिग्गज काँग्रेस नेत्यांची उपस्थिती ; कार्यकर्त्यांची गर्दी