शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात १६० बेशिस्त वाहनधाचालक कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:10 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे १६० बेशिस्त वाहनधारक शहरातील विविध मार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ई-चलनच्या माध्यमातून घरी नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व वाहनधारकांकडून प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे ३२ हजाराचा दंड वसूल केला जाणार आहे. अन्यथा त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले पाठविले जाणार आहेत.

ठळक मुद्देसांगलीत वाहतूक नियमांचे उल्लंघनसीसीटीव्ही कॅमेऱ्यात १६० बेशिस्त वाहनधाचालक कैदनोटीस घरपोच : ३२ हजाराचा दंड वसूल होणार

सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे १६० बेशिस्त वाहनधारक शहरातील विविध मार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ई-चलनच्या माध्यमातून घरी नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व वाहनधारकांकडून प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे ३२ हजाराचा दंड वसूल केला जाणार आहे. अन्यथा त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले पाठविले जाणार आहेत.ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, सीटबेल्ट न घालणे, नियमबाह्य नंबर प्लेट, कर्कश हॉर्न, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन लावणे, लायसन्स नसणे, हेल्मेट न घालणे यासह इतर वाहतूक नियम वाहनधारकांकडून मोडले जातात. वाहतूक पोलिसांनी अडविल्यानंतर दंड भरण्यास टाळाटाळ केली जाते. आपण नियम तोडलाच नाही, असे सांगून वाहतूक पोलिसांशी वाद घालतात.

याला आळा घालण्यासाठी गतवर्षी ई-चलन प्रणाली सुरू केली. ई चलनच्या माध्यमातून बेशिस्त वाहनधारकाचे वाहतूक पोलीस मोबाईलवर फोटो घेऊन त्याला दंडात्मक कारवाईची घरी नोटीस पाठवितात. दुपारच्यावेळी तसेच रात्री आठनंतर वाहतूक पोलीस रस्त्यावर नसतात. त्यावेळीही वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही.सांगली, मिरज व कुपवाड शहरात ७८ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांची मदत घेऊन दररोजच्या फुटेजची तपासणी करुन बेशिस्त वाहनधारकांची यादी बनविली जात आहे. फुटेजमध्ये वाहतूक पोलीस तसेच सिग्नल सुरु असतानाही अनेक वाहनधारकांनी नियम तोडल्याचे स्पष्टपणे दिसते.

ट्रिपल सीट जाणे, मोबाईल बोलणे, सिग्नल लागला असताना झेब्रा क्रॉसींग ओलांडणे, नो-पार्र्कींगमध्ये वाहन लावणे, विरुद्ध दिशेने जाणे आदी वाहतूक नियम तोडलेले १६० वाहनधारक सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम यांनी या वाहनधारकांनातुम्ही वाहतुकीचा नियम कधी व कुठे तोडला, याची नोटीस फोटोसह घरी पाठविली आहे. त्यांना दंड भरावा, अन्यथा न्यायालयात खटला पाठविला जाईल, असा इशारा दिला आहे.वाहनावरील कारवाईचा तपशील

  1. * ट्रिपल सिट : १६
  2. * मोबाईलवर बोलणे : १०
  3. * झेब्रा क्रॉसींग ओलांडणे : २८
  4. * विरुद्ध दिशेने जाणे : ४
  5. * फॅन्सी नंबर प्लेट : २२
  6. * नो-पार्र्कींग : ५६
  7. * सिग्नल जम्पींग : २४

एकूण कारवाई : १६० वाहने

टॅग्स :SangliसांगलीTrafficवाहतूक कोंडीcctvसीसीटीव्ही