शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : वसंतदादा बँक घोटाळ्याचे डाग भाजपवरही : चौकशीचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 12:18 IST

सहकारी बँकांच्या चौकशांचा खेळ जसा आघाडी सरकारच्या काळात रंगला होता, तसाच खेळ आता भाजपच्या काळातही रंगलेला आहे. राजकीय स्वार्थासाठी एक शस्त्र म्हणून या गोष्टींचा वापर होताना दिसत आहे. एकीकडे चौकशांबाबत शासन कठोर असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्थगितींची चाल चालायची अशी दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. घोटाळ्यात अडकलेली मंडळी भाजपच्या तंबूत दाखल झाल्याने भाजपवरही आता घोटाळ्याचे डाग लागले आहेत.

ठळक मुद्देवसंतदादा बँक घोटाळ्याचे डाग भाजपवरही आघाडीच्या वाटेवरच नव्या सत्ताधाऱ्यांची चाल

अविनाश कोळी

सांगली : सहकारी बँकांच्या चौकशांचा खेळ जसा आघाडी सरकारच्या काळात रंगला होता, तसाच खेळ आता भाजपच्या काळातही रंगलेला आहे. राजकीय स्वार्थासाठी एक शस्त्र म्हणून या गोष्टींचा वापर होताना दिसत आहे. एकीकडे चौकशांबाबत शासन कठोर असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्थगितींची चाल चालायची अशी दुटप्पी भूमिका घेतली जात आहे. घोटाळ्यात अडकलेली मंडळी भाजपच्या तंबूत दाखल झाल्याने भाजपवरही आता घोटाळ्याचे डाग लागले आहेत.अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणात यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. राज्यातील अन्य सहकारी संस्थांमध्येही अशाचप्रकारचा स्थगितींचा गोंधळ त्यावेळी सरकारने घातला होता.

भाजपने सहकारी संस्थांमधील घोटाळ््यांवर वक्रदृष्टी ठेऊन काही धोरणे निश्चित केली. तत्कालिन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोटाळे करणाऱ्यांना सोडणार नसल्याची भीमगर्जना केली. अल्पावधितच त्यांची पावलेसुद्धा आघाडीच्याच मळलेल्या वाटेवर पडू लागली.

त्यांच्या काळातही वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात अडकलेल्या दोघां अधिकाऱ्यांना मुक्त करण्यात आले. सहकारमंत्रीपदावर नंतर सुभाष देशमुख विराजमान झाले. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा आदर्श घेत स्थगितीचा खेळ अधिक रंगविला. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेली वसंतदादा बँकेची चौकशी आता ठप्प झाली आहे.बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी २७ माजी संचालक, तीन मृत संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रांवरील सुनावणी सुरू असताना, सर्वांनी म्हणणे सादर केले आहे.

त्यामुळे ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली होती. तरीही वारंवार सहकारमंत्र्यांकडे होणारे अपील, सहकारमंत्र्यांकडून येणारे स्थगिती आदेश यामुळे या प्रक्रियेला बाधा येत आहे. एकीकडे चौकशांना सहकारी खो बसत असतानाही दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी वसंतदादा बँकेतील महापालिकेच्या ठेवी काढून देण्याचा व चौकशी लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत सरकार आग्रही राहिल, असे स्पष्ट केले.चौकशांना अडथळ्यांचे बांध सरकारचेच आणि चौकशा पूर्ण करण्याच्या घोषणाही सरकारच्याच, असा प्रकार आता दिसून येत आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

घोटाळ्यातील मंडळी भाजपमध्येघोटाळ्यात अडकलेले अनेक लोक सध्या भाजपमध्ये जात आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेपाठोपाठ आता वसंतदादा बँकेच्या बाबतीतही हाच प्रकार दिसला. याठिकाणच्या घोटाळ्यात माजी नगरसेवक सुरेश आवटींचे नाव आहे. त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील घोटाळ्याबाबत भाजप नेत्यांचे हातच दगडाखाली अडकले आहेत. आवटींचा हा फॉर्म्युला अन्य लोकही अवलंबण्याच्या तयारीत आहेत.ठेवीदारांचा गोंधळ वाढलाअवसायकांची मुदतही येत्या वर्षभरात संपणार आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांना अद्याप मोठा प्रतिसाद मिळालेला नाही. चौकशी अंतिम टप्प्यात असल्याने कारवाईच्या भितीने अनेकजण पैसे भरतील, अशी आशाही ठेवीदारांना होती. चौकशीचे कामकाजच स्थगितीच्या व प्रलंबित सुनावण्यांच्या खेळात ठप्प झाल्याने उरली-सुरली आशाही आता संपल्याचे दिसत आहे. भाजप सरकारच्या काळात चौकशांचे फलित निघेल म्हणूनही अंदाज बांधले जात होते. तेसुद्धा धुळीस मिळाले आहेत....तर आम्ही चंद्रकांत पाटलांचा सत्कार करूनागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी ज्या जोशात वसंतदादा बँकेच्या घोटाळ््यांची चौकशी तडीस नेण्याचे व महापालिकेच्या अडकलेल्या ठेवी मिळवून देण्याचे आश्वासन येथील जनतेला दिले त्याच जोशात त्यांनी याबाबत पावले उचलावीत. महापालिकेच्या ठेवी म्हणजे जनतेचे पैसे आहेत. त्यामुळे त्या जर पाटील यांनी मिळवून दिल्या तर याच सांगलीत त्यांचा जाहीर सत्कार करू. जर त्यांनी आश्वासन पाळले नाही, तर काय करायचे, याचाही खुलासा त्यांनीच करावा, अशी मागणी बर्वे यांनी केली. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रVasantdada Patilवसंतदादा पाटीलSangliसांगलीChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील