शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

सांगली :  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे रणशिंग :सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 16:07 IST

आगामी सांगली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ताकदीने उतरणार आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवार दि. ४ जून रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील स्टेशन चौकात जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी  पत्रकार बैठकीत दिली.

ठळक मुद्देसांगली :  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे रणशिंग :सुभाष देशमुख फडणवीस, गडकरी चार जूनला सांगलीत

सांगली : आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ताकदीने उतरणार आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवार दि. ४ जून रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील स्टेशन चौकात जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी  पत्रकार बैठकीत दिली.दरम्यान, चार व पाच जूनला सांगलीतच भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.देशमुख म्हणाले, १९९२ नंतर प्रथमच भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक ४ व ५ जूनला होणार आहे. भाजपचे राज्य अधिवेशन महापालिका निवडणुकीच्या वातावरण निर्मितीस पोषक ठरणार आहे. विश्रामबाग येथील खरे क्लब हाऊस येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीस भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, राज्य, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी असे ७०० हून अधिकजण उपस्थित राहणार आहेत.पहिल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असून दिवसभरात शासनाच्या विविध योजना, आगामी महापालिका निवडणूक या विषयावर सविस्तर चर्चा व ठराव होणार आहेत. ५ जून रोजी गडकरी समारोप समारंभावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, लक्ष्मण सावजी, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दिनकर पाटील, दीपक शिंदे, नीता केळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.इच्छुकांना प्रवेशमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणारच आहे. राज्य कार्यकारिणी सभेच्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाSubhash Deshmukhसुभाष देशमुख