शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली वाहतूक पोलिसांच्या कॅमेऱ्याचा डोळा रिक्षा वाहतुकीवर

By संतोष भिसे | Updated: October 29, 2022 18:16 IST

नेमक्या याचवेळी वाहतूक पोलीस कॅमेरा घेऊन सरसावतात. छायाचित्र टिपून ई-चलन तयार करतात.

सांगली : गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिक्षावर वाहतूक पोलीसांच्या ई-चलन कॅमेऱ्याने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे व्यवसाय करणे मुश्किल झाले असून इ-चलन कारवाईतून वगळण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे.यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यात म्हंटले आहे की, रिक्षा चालकाला प्रवाशांच्या मर्जीप्रमाणे व्यवसाय करावा लागतो. प्रवासी हात दाखवेल, तेथे थांबावे लागते. सांगेल तेथे उतरवावे लागते. प्रवाशांमध्ये वयोवृद्ध, महिला व लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यांना चढ-उतार करण्यास अधिक वेळ लागतो. सामानासह लवकर उतरता येत नाही. नेमक्या याचवेळी वाहतूक पोलीस कॅमेरा घेऊन सरसावतात. छायाचित्र टिपून ई-चलन तयार करतात. रिक्षाचालक रात्री घरी जाण्यापूर्वीच मोबाईलवर कारवाईचा मेसेज आलेला असतो.     निवेदनात म्हंटले आहे की, मागेल त्याला रिक्षा परवाना धोरणामुळे रिक्षांची संख्या अतोनात वाढली आहे. रस्त्यावर प्रवासी कमी आणि रिक्षा जास्त  अशी स्थिती आहे. व्यवसायाच्या अपेक्षेने आपसात अनेकदा हाणामाऱ्याही होतात. अशावेळीही वाहतूक पोलीसांच्या कारवाईचा सामना करावा लागतो. मिरजेत तर खड्ड्यांमुळे रिक्षा कोठे थांबवावी असा प्रश्न पडतो. चांगल्या ठिकाणी थांबवावी, तर वाहतूक पोलीसाची भिती असते. दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची जेमतेम कमाई आणि दंडापोटी ५०० ते १००० रुपयांचा भुर्दंड अशी स्थिती आहे. त्यामुळे ई-चलनाच्या कारवाईतून रिक्षाचालकांना वगळावे.निवेदन देण्यासाठी ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे राज्य अध्यक्ष महेश चौगुले, राजू रसाळ, तुषार मोहिते, प्रकाश चव्हाण, संतोष ठोंबरे, सुखदेव कोळी, रफिक खतीब, बाबासाहेब चव्हाण, अमीन मुल्ला, रफिक जमादार, महेश सातवेकर, मारुती सरगर, जावेद पटवेगार, सलीम मलिदवाले, भिमाण्णा यादवाडे आदी उपस्थित होते.सर्वाधिक फोटो रिक्षाचेमहापालिका क्षेत्रात ई-चलनासाठी सर्वाधिक छायाचित्रे रिक्षांचीच काढल्याचा दावा रिक्षा संघटनांनी पोलीस अधीक्षक व वाहतूक शाखेच्या बैठकीत केला. यासंदर्भात अधीक्षकांनी जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत संघटनेच्या उपस्थितीतच चर्चा केली.

टॅग्स :Sangliसांगलीtraffic policeवाहतूक पोलीस