पवनऊर्जा निर्मितीत सांगली अव्वल--ऊर्जा संवर्धन दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:40 PM2017-12-13T23:40:42+5:302017-12-13T23:48:54+5:30

सांगली : पवनऊर्जा, सहवीज निर्मिती (को-जनरेशन) आणि सौरऊर्जेपासून जिल्ह्यात वर्षाला ४३०२ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती होत आहे.

Sangli tops in wind energy generation - Energy Conservation Day Special | पवनऊर्जा निर्मितीत सांगली अव्वल--ऊर्जा संवर्धन दिन विशेष

पवनऊर्जा निर्मितीत सांगली अव्वल--ऊर्जा संवर्धन दिन विशेष

googlenewsNext
ठळक मुद्दे सांगली जिल्ह्यात सहवीज निर्मितीचे आठ साखर कारखान्यांचे प्रकल्पसौरऊर्जेकडेही शेतकºयांचा वाढता कल :

अशोक डोंबाळे ।
सांगली : पवनऊर्जा, सहवीज निर्मिती (को-जनरेशन) आणि सौरऊर्जेपासून जिल्ह्यात वर्षाला ४३०२ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती होत आहे. ऊर्जा निर्मितीत जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले. ऊर्जा निर्मितीबरोबरच कमी वॅटचे बल्ब, ट्यूब आणि फॅनचा वापर करून केंद्र आणि राज्य शासनाने विजेची बचत करण्याचे धोरण जिल्ह्यात राबविले आहे.

जिल्ह्यात आठ साखर कारखान्यांचे सहवीज निर्मितीचे प्रकल्प असून, तेथून वर्षाला २२०३.२ दशलक्ष युनिट वीज तयार होत आहे. साखर कारखाने स्वत:साठी विजेचा तिचा वापर करून उर्वरित वीज महावितरण कंपनीला विक्री करीत आहेत. या प्रकल्पांमुळे साखर कारखाने विजेबाबतीत स्वयंभू झाल्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला आहे. जिल्ह्यातील उर्वरित साखर कारखानेही सहवीज निर्मिती प्रकल्प उभा करण्याच्या तयारीत आहेत.
जत, खानापूर, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यांमध्ये ९३५ पवनचक्क्यांची युनिट बसविली असून, त्यातून १५२७.३६ दशलक्ष युनिट वीज तयार होत आहे. सौरऊर्जा आणि को-जनरेशनमधूनही वीज निर्मिती वाढली आहे. जलविद्युत स्रोतांपेक्षाही जास्त वीज निर्मिती अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून होत आहे. पवनऊर्जेबरोबरच सध्या जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पही वाढत आहेत. खासगी सौरवीज निर्मितीचा पहिला प्रकल्प आटपाडी तालुक्यातील पळसवाडी-दिघंची येथे टाटा सोलरने उभा केला आहे. येथून ५० मेगावॅट वीज तयार होत असून, सातारा जिल्ह्यातील महावितरण कंपनीला ही वीज विकली जात आहे. त्याचप्रमाणे सांगली शहरातील सहा खासगी रूग्णालयांनीही सौरऊर्जेचे प्रकल्प हाती घेतले असून, ते स्वत:साठी त्या विजेचा वापर करीत आहेत. जिल्ह्यातील १६० कुटुंबांनी घराच्या छतावर आणि चार हॉटेलच्या छतावर सोलर पॅनेलच्या साहाय्याने वीज निर्मिती केली असून, तेही स्वत:साठीच वीज वापरत आहेत.

जिल्ह्यात वर्षाला : १५२७ दशलक्ष युनिट वीज
सांगली जिल्ह्यात विविध कंपन्यांनी ९७८ पवनचक्क्या बसविल्या आहेत. वाºयाच्या वेगावर वीज निर्मिती होत असल्यामुळे ज्यावेळी वारा असेल तेव्हाच वीज तयार होत आहे. त्यानुसार जिल्ह्यात पवनचक्क्यांच्या माध्यमातून १५२७.३६ दशलक्ष युनिट वीज तयार होत आहे. खासगी कंपन्यांकडून महावितरण वीज विकत घेऊन ग्राहकांना पुरवठा करीत आहे. पवनऊर्जेचा नव्याने फारसा विस्तार होत नसल्याचे दिसत आहे. वर्षभरात चारच नवीन पवनचक्क्या बसविल्या आहेत, असेही महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.

कचºयापासून वीज निर्मिती
साईन वेब बायोगमास हा कचºयापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प तुंग (ता. मिरज) येथे उत्तरप्रदेशातील उद्योजकांनी उभा केला आहे. सुका कचरा, दगडी कोळसा आणि लाकूड याच्यापासून वीज निर्मिती केली जात आहे. १० मेगावॅट वीज तयार होत आहे. जिल्ह्यातून सुका कचरा उपलब्ध होत नसल्यामुळे ही कंपनी केरळमधून सुका कचरा उपलब्ध करून घेत असल्याचेही महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.

जिल्ह्यात सौरऊर्जेचे छोटे प्रकल्प होणार
शेतकºयांना शेतीसाठी स्वस्त दरात आणि दिवसाही पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासकीय जागांची शासकीय अधिकाºयांनी पाहणी करून तसा प्र्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. प्रतिदिन दोन ते दहा मेगावॅट वीज उपलब्ध होईल, असे सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यात येणार आहेत. प्रतिदिन दोन मेगावॅट वीज निर्मितीसाठी दहा एकर जागेची गरज असून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, कडेगाव, खानापूर या तालुक्यात शासकीय जागा उपलब्ध असल्यामुळे येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मोठी संधी आहे. टेंभू उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याचे शासनाचे धोरण असून त्यासाठी शासनाने निविदाही काढली आहे.

चांदोलीतून दिवसाला चार मेगावॅट वीज
चांदोली (वारणा) येथील धरणाच्या सांडव्यातून जाणाºया पाण्यावर वीज निर्मिती करणारे छोटे दोन प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून प्रत्येकी दोन मेगावॅटप्रमाणे दिवसाला चार मेगावॅट वीज तयार होत आहे. पाण्याचा वेग कमी झाल्यास वीज निर्मितीवर त्याचा परिणाम होत आहे. शासनाने मनावर घेतले तर, चांदोली प्रकल्पातून वीज निर्मितीची क्षमता वाढविता दुप्पट करणे सहज शक्य असल्याचे वीज निर्मिती क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

ऊर्जा संवर्धनाबरोबरच बचतीकडेही लक्ष
ग्राहकांची वाढत्या विजेची मागणी लक्षात घेऊन शासनाने ऊर्जेचे नवीन प्रकल्प उभारण्याबरोबरच ऊर्जा बचतीलाही प्राधान्य दिले आहे. केंद्र सरकारने महावितरणच्या माध्यमातून ऊर्जासक्षम (एलईडी) ‘उजाला’ योजनेची उपकरणे बाजारात आणली आहेत. या योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात कमी वॅटचे बल्ब, त्याचबरोबर ट्यूब आणि फॅनही उपलब्ध आहेत. कमी वॅटमध्ये जादा प्रकाश देण्याचे व विजेची ७० टक्के बचत करण्याचे तंत्र वापरले आहे, असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.

साखर कारखान्यांची वीज निर्मिती क्षमता कारखाना वीज मेगावॅट
उदगिरी १४
सोनहिरा २२
राजारामबापू
(साखराळे) २८
राजारामबापू
(वाटेगाव) १२
रेणुका शुगर १५
(आरग)
सदगुरु श्री श्री १२
क्रांती १९.७
विश्वास १५
एकूण १३७.७

Web Title: Sangli tops in wind energy generation - Energy Conservation Day Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.