शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :  जमीन अधिग्रहणाविरोधात महसूलमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:06 IST

रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता जमिन अधिग्रहीत केल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

ठळक मुद्देजमीन अधिग्रहणाविरोधात महसूलमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनउमेश देशमुख यांचा इशारा , सांगली ते कोल्हापूर शेतकरी दिंडीचेही आयोजन

सांगली : रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता जमिन अधिग्रहीत केल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सांगली ते कोल्हापूर शेतकरी दिंडीने जात मंगळवार दि. ११ पासून कोल्हापूरातील महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.देशमुख म्हणाले, रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण सुरू आहे. अधिग्रहण करत असताना शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार केलेला नाही. प्रशासनाने प्रसिध्दीमाध्यमातून जमीन अधिग्रहण केल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यावर कार्यवाही झालेली नाही.यासह देवस्थान इनाम वर्ग ३ची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचेही काही प्रश्न प्रलंबीत आहेत. या दोन्ही प्रश्नावर सोमवार दि. १० डिसेंबर रोजी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून पायी दिंडीस प्रारंभ होणार आहे.रात्री अतिग्रे येथे मुक्काम करून ११ डिसेंबर रोजी दिंडी कोल्हापूरात पोहचून महसूल मंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार भूमीअधिग्रहण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, सांगली-कोल्हापूर राज्यमार्गाचे अधिग्रहण झाल्याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचे अधिग्रहण करू नये, अधिग्रहीत जमिनीवरील घरे, झाडे, विहिरी, बोअरवेल्स या सर्वांची बाजारभावाच्या पाचपटीने मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून जाहीर करावे, महामार्गाचा झालेला चूकीचा सर्व्हे मान्य नसल्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व्हे करावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी दिगंबर कांबळे, गुलाब मुलाणी यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.देवस्थान इनाम जमिनींचेही प्रश्नदेवस्थान इनाम वर्ग ३ ची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून समस्या कायम आहेत. ही जमीन कसणाऱ्यांच्या नावावर झाली पाहिजे या मागणीसह इतर प्रश्नांची सोडवणूक करावी अशीही मागणी करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्गSangliसांगली