शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे  :संभाजीराव भिडे, पोलिसप्रमुखांना केली विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 12:45 IST

कर्तव्यात कसूरपणा करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे. त्यांचा काही दोष नाही, असेही भिडे यांनी सांगितले.

ठळक मुद्देपाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे  :संभाजीराव भिडेपोलिसप्रमुखांना केली विनंती

सांगली : कर्तव्यात कसूरपणा करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे. त्यांचा काही दोष नाही, असेही भिडे यांनी सांगितले.गेल्या काही वर्षापासून भिडे यांना दोन पोलिसांचे संरक्षण होते. कोरेगाव भीमा घटनेनंतर त्यांच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. दिवस आणि रात्र अशा दोन सत्रात त्यांच्या सुरक्षेसाठी दहा पोलीस तैनात केले आहेत.

२० एप्रिलला भिडे हे पहाटे साडेपाच वाजता एसटी बसने कामानिमित्त पुण्याला गेले होते. ही बाब रात्र ड्युटीवर त्यांच्या संरक्षणासाठी असलेले पोलीस हवालदार ए. के. कोळेकर, टी. बी. कुंभार, एस. ए. पाटील, व्ही. एस. पाटणकर व ए. एस. शेटे यांना समजली नाही.

सकाळ सत्रातील सुरक्षेचे पाच पोलीस ड्युटीवर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. ही बाब जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना समजताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत पाचही पोलीस भिडे यांच्यासोबत पुण्याला गेले नसल्याची माहिती मिळाली होती.कर्तव्यात कसूरपणा केल्याबद्दल या पाचही पोलिसांना शर्मा यांनी शुक्रवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले होते.

भिडे यांना या कारवाईचे वृत्त समजताच त्यांनी तातडीने शर्मा यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क साधला. साहेब, आपण निलंबित केलेल्या पाच पोलिसांचा काहीच दोष नाही. त्यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती केली.

तसेच मला सुरक्षेची काही गरज नाही. मी कुठेही फिरत असतो, विनाकारण तुमच्या लोकांचे हाल होतात. माझ्या संरक्षणासाठी दिलेले हे पोलिस अन्य कामासाठी घ्यावेत, असेही सांगितले. यावर शर्मा यांनी ही खात्यांतर्गत बाब आहे. आमच्या लोकांची चूक असल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली आहे, असे सांगितले.सुरक्षेत पुन्हा नियमिततापाच पोलिसांना निलंबित केल्यानंतर भिडे यांच्या संरक्षणासाठी नव्याने पाच पोलीस तैनात केले आहेत. हे पोलिसही सांगली शहर, विश्रामबाग व पोलीस मुख्यालयातील घेण्यात आले आहेत. सध्या तैनात केलेल्या पोलिसांना भिडे यांच्या संरक्षणात कोणत्याही प्रकाररचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीPoliceपोलिसSangliसांगली