शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : टेंभू योजनेकडील ७४ पदांना कात्री, सुधारित आकृतिबंध जाहीर : शासनाकडून ३० टक्केहून अधिक पदे रद्द झाल्यामुळे अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:00 IST

अशोक डोंबाळे सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेकडील विभागीय व उपविभागीय बांधकाम कार्यालये गुंडाळण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने आठ दिवसांपूर्वी घेतला आहे. तोपर्यंत चार दिवसांपूर्वी टेंभू योजनेकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध शासनाने प्रसिध्द केला असून त्यानुसार केवळ ५० पदांनाच मंजुरी दिली आहे. उर्वरित शाखा अभियंत्यांसह ७४ पदांना शासनाने कात्री लावल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये ...

ठळक मुद्देटेंभू योजनेकडील ७४ पदांना कात्री, सुधारित आकृतिबंध जाहीर शासनाकडून ३० टक्केहून अधिक पदे रद्द झाल्यामुळे अधिकारी, कर्मचारी अस्वस्थयोजनेची कामे ठप्प होणार

अशोक डोंबाळे 

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेकडील विभागीय व उपविभागीय बांधकाम कार्यालये गुंडाळण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने आठ दिवसांपूर्वी घेतला आहे. तोपर्यंत चार दिवसांपूर्वी टेंभू योजनेकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध शासनाने प्रसिध्द केला असून त्यानुसार केवळ ५० पदांनाच मंजुरी दिली आहे. उर्वरित शाखा अभियंत्यांसह ७४ पदांना शासनाने कात्री लावल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कामे वाढली असताना पदे कमी कशी झाली, याचीच अधिकाऱ्यांमध्ये चिंता आहे.संगणकीकरणाच्या नावाखाली राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयातील ३० टक्के पदांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शासनाने सर्व शासकीय कार्यालयांकडून सुधारित आकृतिबंध आराखडा मागविला होता. बहुतांशी कार्यालयांनी सुधारणा करुन आराखडे शासनाकडे सादरही केले आहेत.

टेंभू उपसा सिंचन योजनेकडील विभागीय आणि उपविभागीय बांधकाम कार्यालये बंद करुन तेथील पदे अन्य ठिकाणी वर्ग करण्याचा निर्णय दि. १० जानेवारी २०१८ रोजी घेतला होता. तोपर्यंत राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने टेंभू उपसा सिंचन योजनेकडील पदांनाही कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.

टेंभू उपसा सिंचन योजना विभाग क्रमांक एककडे कार्यकारी अभियंता एक, उपकार्यकारी अभियंता एक, उपअभियंता पाच, शाखा अभियंता २४, भांडारपाल एक, सहाय्यक भांडारपाल एक, विभागीय लेखापाल एक, आरेखक व सहाय्यक आरेखक, अनुरेखक सात, कनिष्ठ लिपिक व टंकलेखक २२, वरिष्ठ लिपिक १०, नाईक एक, शिपाई १५, चौकीदार सहा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २०, वाहन चालक सहा अशी १२४ पदे मंजूर होती.

नवीन आकृतिबंधामध्ये कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची पदे पूर्वीप्रमाणे जैसे थे ठेवली आहेत. शाखा अभियंत्यांची चार पदे रद्द केली असून भांडारपाल हे पदच बंद केले आहे. त्याऐवजी एकच सहाय्यक भांडारपाल हे पद ठेवले आहे. आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखक अशी एकत्रित सात पदे कार्यरत असून, नवीन आकृतिबंधामध्ये एकच पद ठेवले आहे. उर्वरित सहा पदांना कात्री लावण्यात आली आहे.

कनिष्ठ लिपिक, टंकलेखक यांची २२ पदे कार्यरत असून, सुधारित आकृतिबंधामध्ये चौदा पदे रद्द झाली आहेत. केवळ आठ कर्मचाऱ्यांवरच सर्व कामाचा ताण पडणार आहे. वरिष्ठ लिपिकाचीही सहा पदे रद्द झाली असून, चारच कार्यरत राहणार आहेत.शिपायाच्या १५ पैकी ११ पदांची कपात करुन चारच ठेवली आहेत. चौकीदाराची सहापैकी केवळ दोनच पदे मंजूर आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची सध्या वीस पदे कार्यरत आहेत. नवीन आकृतिबंधामध्ये एकही पद ठेवलेले नाही. वाहन चालकाची सहा पदे कार्यरत होती. भविष्यात एकही पद ठेवलेले नाही. सध्या १२४ पदे कार्यरत असून नवीन आकृतिबंधानुसार ७४ पदे कमी होऊन केवळ ५० पदेच कार्यरत राहणार आहेत.

राज्य शासनाच्या या निर्णयानुसार टेंभू उपसा योजनेकडील कामावर त्याचा परिणाम होणार आहे. आजही टेंभू योजनेकडील ४० टक्के कामे अपूर्ण आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही त्याची कामे करुन घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नसल्यामुळे, ती खोळंबण्याची शक्यता आहे. लिपिकाची ६० टक्के पदे कपात केल्यामुळे योजनेच्या निविदा प्रक्रिया राबविण्यासह विकास कामे राबविण्यावर त्याचा परिणाम होणार आहे.

टेंभू योजनेकडे पदेपद                                सध्या कार्यरत                  नवीन आकृतिबंधकार्यकारी अभियंता                    १                                   १उपकार्यकारी अभियंता               १                                   १उपअभियंता                               ५                                  ५शाखा अभियंता                         २४                                २०भांडारपाल                                    १                                 ०सहाय्यक भांडारपाल                    १                                 १विभागीय लेखापाल                     १                                 १आरेखक, अनुरेखक                      ७                                १कनिष्ठ लिपिक, टंकलेखक         २२                               ८वरिष्ठ लिपिक                           १०                                ४नाईक                                          १                                १शिपाई                                      १५                                 ४चौकीदार                                    ६                                 २स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  २०                             ०वाहनचालक                                  ६                              ०एकूण                                        १२४                           ५०योजनेची कामे ठप्प होणारटेंभू उपसा सिंचन योजनेकडील कालवे, पोटकालव्यांचा आराखडा करणे, कामावर देखरेख करण्यात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शाखा अभियंता, आरेखक, अनुरेखक यांची महत्त्वाची जबाबदारी असते. नवीन आकृतिबंधामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची सर्वच २२ पदे, शाखा अभियंत्याची चार आणि आरेखक, अनुरेखकाची सहा पदे रद्द केली आहेत. ही महत्त्वाची पदे रद्द केल्याने, निधी असूनही योजनेची कामे पूर्ण करण्यात मोठा अडथळा येणार आहे. याचा लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणSangliसांगली