शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :माधवनगरला एसटीचे वर्कशॉप, बसस्थानक, एसटी प्रशासनाकडून मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 11:58 IST

माधवनगर (ता. मिरज) येथे एसटी महामंडळाची दहा एकर मोकळी जागा असून, याठिकाणी सांगली आगाराचा वर्कशॉप विभाग आणि छोटे बसस्थानक करण्यास सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. एसटी महामंडळाकडून येत्या महिन्याभरात कामाची निविदाही निघणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्दे माधवनगरला एसटीचे वर्कशॉप, बसस्थानक, एसटी प्रशासनाकडून मंजुरीसात कोटींचा निधी मंजूर; महिन्यात निविदा निघणार, प्रलंबित प्रश्न मार्गी

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथे एसटी महामंडळाची दहा एकर मोकळी जागा असून, याठिकाणी सांगली आगाराचा वर्कशॉप विभाग आणि छोटे बसस्थानक करण्यास सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. एसटी महामंडळाकडून येत्या महिन्याभरात कामाची निविदाही निघणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.सांगलीचे मध्यवर्ती एसटी बसस्थानक १९६३ पासून अस्तित्वात आहे. सहा एकर जागा असून, यामध्ये शहरी आणि लांब पल्ल्याच्या एसटींची वाहतूक येथून होते. याशिवाय कार्यशाळा, एसटी बॅँकेसह विविध कार्यालये या जागेमध्ये आहेत. या बसस्थानकावर बसेस आणि प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे येथील वर्कशॉप विभाग माधवनगर येथील जागेत हालविण्याची मागणी ज्येष्ठ कामगार नेते बिराज साळुंखे यांनी गेल्या वीस वर्षांपासून एसटी महामंडळाकडे केली होती.

यासाठी अनेक आंदोलनेही त्यांनी केली होती. एसटी महामंडळाची माधवनगर जकात नाक्याजवळील जागा अत्यंत मोक्याची असल्यामुळे या जागेवर अनेकांचा डोळा होता. हे ओळखून बिराज साळुंखे यांनी माधवनगर एसटी बसस्थानक व डेपो कृती समिती गठित करून शासन दरबारी लढा दिला होता.

आज बिराज साळुंखे हयात नाहीत, पण त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. म्हणूनच एसटी महामंडळाने माधवनगर येथे सांगलीतील वर्कशॉप विभाग हलविण्यास मंजुरी दिली आहे.

माधवनगरच्या जागेत वर्कशॉप विभागासह लहान बसस्थानकही बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी सात कोटींची तरतूद महामंडळाने केली आहे. या कामाची येत्या महिन्याभरात निविदाही महामंडळ काढणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी सांगितले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSangliसांगली