शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

सांगलीच्या जागेचा तिढा कायम, उद्धव ठाकरे निर्णयावर ठाम; निर्णय पुन्हा दिल्लीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 11:57 IST

काँग्रेसने सांगलीच्या हक्काच्या जागेवरील दावा सोडलेला नाही

सांगली : महाविकास आघाडीच्या बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत सांगलीच्या जागेचा तिढा सुटला नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी आम्ही सांगली सोडू शकत नाही, अशी ठाम भूमिका मांडली. त्यावर उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या सांगलीच्या उमेदवाराने प्रचारही सुरू केल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, दिल्लीतील नेत्यांशी बोलणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतरही काँग्रेसने सांगलीच्या हक्काच्या जागेवरील दावा सोडलेला नाही. या जागेच्या अंतिम टप्प्यातील चर्चेसाठी बुधवारी आघाडीतील प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. त्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी सांगली मतदारसंघाबाबत काँग्रेसच्या भूमिकेचा निरोप ठाकरे गटाला दिला. परंतु शिवसेनेकडून सांगलीबाबत तडजोड करण्यास नकार देण्यात आला.सांगलीसह तीन जागाबाबत निर्णय झाल्याशिवाय महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद घेता येणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले. त्यामुळे आजची महाविकास आघाडीची बैठक सांगली बाबत कोणताही निर्णयविना संपली. गुरुवारी पुन्हा सकाळी या विषयावर चर्चा होईल. काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींसोबत ठाकरे गटाकडून चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.

चंद्रहार पाटील यांच्या प्रचारापासून काँग्रेस अलिप्तमहाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटत नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय व प्रस्ताव जिल्हा काँग्रेसने दिला होता; परंतु त्यावरही निर्णय होत नसल्याने उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारापासून काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले आहे.

विश्वजित कदम यांच्या भूमिकेकडे लक्ष ?सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी प्रचार समितीच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या दबावतंत्रानंतरही सांगलीच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे डॉ. कदम यापुढे काय भूमिका घेणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभा