शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

सांगली : घनकचरा व्यवस्थापनात घोटाळा, अमित शिंदे : महापालिका आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:14 AM

सांगली महापालिकेच्या आजवरच्या अनेक घोटांळ््यांमध्ये आता घनकचरा व्यवस्थापनातील घोटाळ््याची भर पडली आहे. याप्रकरणी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत, अशी माहिती जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे व प्रा. आर. बी. शिंदे यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापनात घोटाळा : अमित शिंदे सांगली महापालिका आयुक्तांना निलंबित करण्याची मागणीवीजेशिवाय यंत्र चालविले, वर्गीकरणाशिवाय वीजवापरआयुक्तांना निलंबित करा!

सांगली : महापालिकेच्या आजवरच्या अनेक घोटांळ््यांमध्ये आता घनकचरा व्यवस्थापनातील घोटाळ््याची भर पडली आहे. याप्रकरणी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत, अशी माहिती जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे व प्रा. आर. बी. शिंदे यांनी  पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत महापालिकेने प्रत्येकी ३८ लाख रुपयांचे दोन सेग्रिगेटर (कचरा वर्गीकरण यंत्र) खरेदी केले होते. एक बेडग रोड आणि दुसरा समडोळी रोड अशा दोन ठिकाणच्या कचरा डेपोवर दाखविण्यात आला आहे.

दोनपैकी एकच सेग्रिगेटर जागेवर असून त्याच्या वापराबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेग्रिगेटरचे अपयश व भ्रष्टाचार लपविण्यासाठी विजेचा वापर न करताच कचऱ्यांचे वर्गीकरण केल्याची हास्यास्पद माहिती महापालिकेने माहितीच्या अधिकारात दिली आहे.

घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा केल्याबद्दल हरीत न्यायालयात समितीने यापूर्वीच याचिका दाखल केली होती. याचिकेवरील निकालामुळे महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला, मात्र कोणतीही अंमलबजावणी केली नाही.न्यायालयीन आदेशानंतर केवळ औपचारिकता म्हणून महापालिकेने सेग्रिगेटर वापराचे नाटक सुरू केले आहे. या यंत्रांच्या वापराचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर एकच यंत्र अस्तित्वात असल्याचे दिसून आले. त्या यंत्राच्या माध्यमातूनही केवळ वर्षभरात २४0 टन कचऱ्यांचेच वर्गीकरण केले आहे.

केवळ जुजबी उपाययोजना करून या यंत्रांच्या माध्यमातून मोठा घोटाळा करण्यात आला आहे. सेग्रिगेटर खरेदी व त्याच्या वापराबाबतची खोटी माहितीही महापालिकेने हरीत न्यायालयात सादर केली आहे. म्हणजेच त्यांनी कोर्टाची सुद्धा दीशाभूल केली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या अंदाजपत्रकातील नाविण्यपूर्ण योजनेतून सेग्रिगेटरसाठी पैसे घेण्यात आले आहेत. त्यामुळे आमच्या मते हा एक नाविन्यपूर्ण योजनेतून घडलेलगा नाविण्यपूर्ण भ्रष्टाचार आहे, असे ते म्हणाले. यावेळी तयंच्यासोबत आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, अ‍ॅड. अरुणा शिंदे, जयंत जाधव उपस्थित होते.वीजेशिवाय यंत्र चालविले...एप्रिल २0१७ मध्ये ३0 टन आणि मे २0१७ मध्ये १00 टन असे दोन महिन्यात एकूण १३0 टन कचºयाचे वर्गीकरण सेग्रिगेटरच्या माध्यमातून केल्याची लेखी माहिती महापालिकेने दिली आहे. या दोन्ही महिन्याकरीता वीजेचा वापर शून्य दाखविला आहे. म्हणजेच वीजेशिवाय यंत्र चालविण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी महापालिकेची नोबेल पारितोषिकासाठी शिफारस व्हायला हवी, असे शिंदे म्हणाले.वर्गीकरणाशिवाय वीजवापरएकीकडे महापालिकेने वीजेशिवाय कचरा वर्गीकरण केल्याची माहिती दिली आहे, तर दुसरीकडे कचरा वर्गीकरणाशिवाय वीजही खर्च केल्याची आकडेवारी दिली आहे. त्यामुळे हा घोटाळा त्यांनीच स्वत:हून कबुल केल्याचे दिसत आहे, असे शिंदे म्हणाले.

आयुक्तांना निलंबित करा!महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना याप्रकरणी निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे करणार आहोत. त्यांनी कारवाई केली नाही, तर दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात आम्ही हरीत न्यायालयात तक्रार करू, असा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली