शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: टेलिग्राम ग्रुपद्वारे फसवणूक करणाऱ्याचे पावणे आठ कोटी रुपये गोठविले, सायबर पोलिसांची कामगिरी

By शरद जाधव | Updated: August 11, 2023 21:56 IST

Sangli Crime News: टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या २१ लाख रुपयांचा शोध पोलिसांनी घेतला. या वेळी पोलिसांना फसवणूक करणाऱ्याच्या खात्यातील तब्बल सात कोटी ८१ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात यश आले.

- शरद जाधवसांगली  - टेलिग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून लाटण्यात आलेल्या २१ लाख रुपयांचा शोध पोलिसांनी घेतला. या वेळी पोलिसांना फसवणूक करणाऱ्याच्या खात्यातील तब्बल सात कोटी ८१ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात यश आले. ‘कॅपिटालिक्स’ नावाच्या ग्रुपवरून ट्रेडिंग केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत इस्लामपूर येथील एकाचे २१ लाख १० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला होता. याचा शोध घेताना पोलिसांना पावने आठ कोटींची रक्कम गोठविण्यात यश आले, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.

इस्लामपूर येथील हर्षवर्धन विश्वासराव पाटील यांना कॅपिटालिक्स ग्रुपवरून चॅटिंग करून ऑनलाइन ट्रेडिंगबाबत माहिती देण्यात आली होती. ट्रेडिंग करण्यासाठी वेगवेगळी २० बाेगस बँक खाती त्यांना देण्यात आली होती. या खात्यावर त्यांनी २१ लाख १० हजार रुपयांची रक्कम पाठविली होती. यानंतर पाटील यांना परतावा मिळण्याची प्रतीक्षा होती. यानंतर संशयितांनी त्यांना गुंतवलेली रक्कम परत मिळविण्यासाठी कर म्हणून अजून १० लाख ८५ हजार ५०० रुपये गुंतवावे लागतील, असे चॅटिंगवरच सांगितले. त्यासाठी आणखी पाच बनावट खाती दिली होती.

या व्यवहाराबाबत पाटील यांना शंका आल्याने त्यांनी इस्लामपूर पोलिस ठाणे व सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता, संबंधितांची २७ बनावट खाती तपासण्यात आली. यात सर्व खात्यांवर मिळून तब्बल सात कोटी ८१ लाख रुपयांची रक्कम असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तातडीने ही सर्व खाती ‘फ्रीज’ करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी दिली.

सोशल मीडियावर व्यवहार जपून करासध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यात ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे जादा पैसे मिळवून देण्याचेही आमिष दाखविण्यात आले आहे. टेलिग्रामवरील ‘कॅपिटालिक्स’सह अन्यही काही ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारची फसवणूक झाल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली