शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : उपनगरांत रस्ते दलदलीत, घरे पाण्यात, नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 15:00 IST

सांगली शहरात गुरुवारी झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने महापालिकेच्या यंत्रणेचे वाभाडे काढले. गावठाण परिसरात अनेक घरात पाणी शिरले होते. स्टेशन चौकात पोलिसांची घरे, तसेच पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही पाण्याने वेढा दिला. उपनगरांतील रस्ते तर चिखलात रुतले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. ड्रेनेज यंत्रणा कोलमडल्याने सांडपाणी रस्त्यावर आले होते.

ठळक मुद्देसांगली उपनगरांत रस्ते दलदलीत, घरे पाण्यात, नागरिकांचे हाल झाडे पडली; यंत्रणा कोलमडली; एकाच पावसाने महापालिकेच्या यंत्रणेचे वाभाडे

सांगली : शहरात गुरुवारी झालेल्या पहिल्याच वादळी पावसाने महापालिकेच्या यंत्रणेचे वाभाडे काढले. गावठाण परिसरात अनेक घरात पाणी शिरले होते. स्टेशन चौकात पोलिसांची घरे, तसेच पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही पाण्याने वेढा दिला. उपनगरांतील रस्ते तर चिखलात रुतले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. ड्रेनेज यंत्रणा कोलमडल्याने सांडपाणी रस्त्यावर आले होते.

पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयालाही पाण्याने वेढावादळी वारा व मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना उडाली होती. खणभाग, गावभाग, विश्रामबाग परिसरातील गावठाण भागात अनेक घरात पाणी शिरले होते. गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

गावठाणापेक्षा उपनगरांतील नागरिकांचे मोठे हाल झाले. ड्रेनेज, पाणी योजनेच्या खुदाईमुळे उपनगरांत रस्त्यांची चाळण झाली आहे. शामरावनगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, आप्पासाहेब पाटीलनगर, त्रिमूर्ती कॉलनी, विनायकनगर, अष्टविनायक कॉलनी, कोल्हापूर रस्ता, रामनगर, रुक्मिणीनगरातील रस्ते दलदलीत अडकले. खुल्या भूखंडांवर तर सांडपाणी साचून दलदल, घाणीचे साम्राज्य होते.

मुख्य शामरावनगरच्या रस्त्यावरूनच दलदलीतून सुरू होणारा प्रवास पुढे गुडघाभर चिखलातून होतो. त्यातूनच विद्यार्थी, महिलांना ये-जा करावी लागत आहे. आता हे चित्र साठलेले पाणी हटेपर्यंत कायम राहणार आहे. एवढेच नव्हे, तर पावसाळ्यात यापेक्षा भयावह अवस्था होऊन नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल होणार आहे.उपअधीक्षक कार्यालयात सांडपाणीशहरात ड्रेनेजच्या कुचकामी कारभाराने गेल्या महिन्याभरापासून गटारगंगा रस्त्यांवर, घरांमध्ये शिरत आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने पुन्हा तळे साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. स्टेशन चौकात तर शुक्रवारीही हे गटारगंगेचे पाणी चक्क उपअधीक्षक कार्यालयात शिरले. त्यातूनच अधिकारी, पोलीस व नागरिकांना ये-जा करावी लागत होती. अनेक ठिकाणी विद्युतपंप लावून सांडपाणी हटविण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Sangliसांगलीroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस