शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत रिक्षा चालकास लुबाडले, शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 15:57 IST

मिरजेतील कैकाडी गल्लीतील चंद्रकांत सुरेश माने (वय २८) या रिक्षा चालकास बेदम मारहाण करुन लुबाडण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईल व सातशे रुपयांची रोकड लंपास केली. मुख्य बसस्थानकाजवळील मॉडर्न बेकरीजवळ रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसांगलीत रिक्षा चालकास लुबाडले, शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल मोबाईल, रोकड लंपास

सांगली : मिरजेतील कैकाडी गल्लीतील चंद्रकांत सुरेश माने (वय २८) या रिक्षा चालकास बेदम मारहाण करुन लुबाडण्यात आले. त्यांच्याकडील मोबाईल व सातशे रुपयांची रोकड लंपास केली. मुख्य बसस्थानकाजवळील मॉडर्न बेकरीजवळ रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सौरभ (पूर्ण नाव निष्पन्न नाही) तसेच दोन अनोळखी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. चंंद्रकात माने मिरज ते सांगली प्रवासी वाहतूक करतात. रविवारी सायंकाळी पाच वाजता ते प्रवासी घेऊन सांगलीत आले होते. मुख्य बसस्थानकाजवळ ते प्रवासी उतरल्यानंतर मॉडर्न बेकरीजवळ मिरजेला प्रवासी नेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी संशयित तिघे त्यांच्याजवळ आले.

माने यांनी रिक्षातील डॅशबोर्डसमोर मोबाईल ठेवला होता. तो संशयितांनी उचलून घेण्याचा प्रयत्न केला. माने यांनी त्यांना विरोध केला. आपण कोण, मोबाईल का हात लावला आहेह्ण, अशी विचारणा केली. यातून त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. संशयितांनी माने यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या शर्टाच्या खिशातील सातशे रुपये काढून घेतले. नागरिकांनी गर्दी करताच संशयित पसार झाले. माने यांनी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली.जबरी चोरीचा गुन्हासौरभसह तिनही संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे. या मॉडर्न बेकरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन संशयितांचा शोध सुरु ठेवला आहे. ते त्याच परिसरातील असावेत, असा अंदाज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली