शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

सांगली:आरवडेत ‘हुसेनवाला डे’च्या आठवणींना उजाळा : १९६५च्या भारत-पाकिस्तान युध्दातील शौर्यगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 20:15 IST

आरवडे (ता. तासगाव) येथे भारतीय लष्करातील सेकंड मराठा काली पांचवीच्या बहादूर आजी-माजी सैनिकांनी मोठ्या जल्लोषात ‘हुसेनवाला डे’ साजरा केला. यावेळी या तुकडीच्या सदस्यांनी जुन्या वैभवशाली आठवणींना उजाळा दिला.

ठळक मुद्देमाजी सैनिकांची उपस्थिती -भारत आणि पाकिस्तान यांच्यात २१ सप्टेंबर १९६५ रोजी लढाई मांजर्डे न्यूज : आरवडे (ता. तासगाव) येथे ‘हुसेनवाला डे’च्या कार्यक्रमात कर्नल शिवाजी बाबर यांनी आठवणी मांडल्या. यावेळी विविध जिल्ह्यातील माजी सैनिक उपस्थित होते.

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथे भारतीय लष्करातील सेकंड मराठा काली पांचवीच्या बहादूर आजी-माजी सैनिकांनी मोठ्या जल्लोषात ‘हुसेनवाला डे’ साजरा केला. यावेळी या तुकडीच्या सदस्यांनी जुन्या वैभवशाली आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल शिवाजी बाबर होते, तर कर्नल एन. डी. जानकर प्रमुख पाहुणे होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २१ सप्टेंबर १९६५ रोजी लढाई झाली होती. या युद्धात सेकंड मराठा काली पांचवी या सेनेच्या तुकडीने अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानच्या सैन्याला पंजाब गुरुदासपूर येथील हुसेनवाला गावात येण्यापासून रोखून परत पाठवले. भारत सरकारने तुकडीच्या या शौर्याची दखल देऊन गौरव केला. त्यामुळे या तुकडीतील आजी, माजी सैनिक ‘हुसेनवाला डे’ साजरा करतात. सांगली जिल्'ात आरवडे येथे पहिल्यांदाच हा विजय दिवस साजरा करण्यात आला

ब्रिटिश काळात सेकंड मराठा बटालियनची स्थापना झाली. यावर्षी आॅगस्टमध्ये या बटालियनला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. या बटालियनला शौर्याचा इतिहास आहे. १९६५ च्या युद्धात कर्नल टी. टी. नोलन यांच्या नेतृत्वाखाली या तुकडीने हुसेनवाला गावात तीन हजार सैनिकांना सळो की पळो करून सोडले होते. या भारतीय सेनादलच्या तुकडीत फक्त आठशे सैनिक होते. या तुकडीच्या पराक्रमामुळे पाक सैन्याला भारतात पाय ठेवता आला नाही. पण या मोहिमेत भारतीय सैन्यदलाचे कर्नल नोलन व ११ सैनिक शहीद झाले. भारत सरकारने या पराक्रमाची दखल घेत या तुकडीला मानाचे पारितोषिक देऊन गौरविले. त्यामुळे हा दिवस हुसेनवला विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन कॅप्टन लक्ष्मण चव्हाण व कॅप्टन रामहरी राडे यांनी केले. यावेळी कॅप्टन प्रताप शिंदे, कॅप्टन महादेव कदम, कॅप्टन शिवाजी जाधव, कॅप्टन बाबासाहेब माने, कॅप्टन प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी जिल्'ातील ३०० हून अधिक माजी सैनिक कुटुंबियांसह उपस्थित होते.अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रूतब्बल ३० ते ४० वर्षांनंतर काही निवृत्त सैनिकांची भेट झाली. एकमेकांना अलिंगन देताना त्यांना गहिवरून आले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले होते. काही निवृत्त सैनिकांची दुसरी व तिसरी पिढीही सैन्य दलात दाखल झाली आहे. अनेकांनी भारतीय सेवेत असताना १९६२ च्या चीन युद्धातील, तर १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील, तसेच १९९९ च्या कारगिल युद्धातील थरारक प्रसंग सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात बाहेर गावाहून आलेल्या माजी सैनिकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.