शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तीन महिन्यानंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:14 IST

CoronaVirus, sanglinews तीन महिन्यानंतर जिल्ह्यात मंगळवारी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ७४ नवे रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी महापालिका क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देसांगलीत तीन महिन्यानंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद महामारीचा वेग मंदावला : दिवसभरात ७४ रुग्ण

सांगली : तीन महिन्यानंतर जिल्ह्यात मंगळवारी सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ७४ नवे रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी महापालिका क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. महापालिका क्षेत्रात मंगळवारी १८ कोरोना रुग्ण आढळून आले. यात सांगलीत ६ तर मिरज शहरात १२ जणांचा समावेश आहे. आटपाडी, पलूस तालुक्यात प्रत्येकी दोन, कडेगाव तालुक्यात ६, खानापूरमध्ये १३, तासगावात १२, जतमध्ये १, कवठेमहांकाळ व वाळवा तालुक्यात प्रत्येकी ५, मिरज ७, शिराळा तालुक्यात तीन रुग्ण आढळून आले. तर तासगाव व शिराळा तालुक्यातील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला.दिवसभरात आरटीपीसीआरच्या ५८५ चाचण्या करण्यात आल्या. यात २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर अँटीजेनच्या १९१५ चाचण्यात ५७ रुग्ण सापडले. सध्या १५९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ऑक्सीजनवर १२५, हायफ्लो नेझल ऑक्सीजनवर ६, नॉन इन्व्हेजीव व्हेंटिंलेटरवर २६ तर इन्व्हेजीव व्हेंटिलेंटरवर २ जण आहेत.सांगलीकरांना दिलासाजुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ झाली. सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाचा कहर झाला होता. तब्बल २४ हजार रुग्ण या महिन्यात सापडले होते. पण गेल्या चार ते पाच दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली.दिवसभरात

  • आजचे रुग्ण : ७४
  • उपचाराखालील रुग्ण : १३७५
  • आजअखेर बरे झालेले रुग्ण : ४२,३६९
  • मृत रुग्ण : १६५०
  • आजअखेरचे एकूण रुग्ण : ४५,३९४
  • चिंताजनक : १५९
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली