शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : खरीप हंगामात शेतकऱ्याला आवश्यक सुविधा द्या :  दीपक म्हैसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 17:57 IST

सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. मात्र, विविध कारणांमुळे आतापर्यंत पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. परिणामी या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासह अन्य आवश्यक सुविधा द्या. बँकांनीही पात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी मागणीप्रमाणे विनाविलंब पीककर्ज द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्दे खरीप हंगामात शेतकऱ्याला आवश्यक सुविधा द्या :  दीपक म्हैसेकरजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

सांगली : सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. मात्र, विविध कारणांमुळे आतापर्यंत पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. परिणामी या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासह अन्य आवश्यक सुविधा द्या. बँकांनीही पात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी मागणीप्रमाणे विनाविलंब पीककर्ज द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, उपायुक्त (महसूल) प्रतापराव जाधव, अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक विलास काटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. त्या तुलनेत आतापर्यंत पेरण्यांचे प्रमाण कमी आहे. त्याच्या कारणांचा आढावा कृषी विभागाने घ्यावा. बी-बियाणे, खते यांचा पुरेशा प्रमाणात साठा करून, मागणीप्रमाणे पुरवठा करावा. शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, शेतकरी बांधवांना पेरणीसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी बांधवांना समाधानकारक पीक कर्ज वाटप केले आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे अद्याप केवळ 25 टक्केच उद्दिष्ट गाठले आहे.

हे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्याचे प्रमाण वाढविण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना सूचित करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे तसेच कृषि विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि अनुषंगिक केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा आढावा डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यावेळी घेतला. जलयुक्त शिवार योजना 2018-19 आराखडा उपविभागीय अधिकारी यांनी स्वत: आराखडा तपासून खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली