शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : महापालिका निवडणुकीची राजकीय गणिते बदलणार, मोठ्या प्रभागांबद्दल नगरसेवकांत मतभिन्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:42 IST

सांगली महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे सादरीकरण उद्या, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार आहे. रचनेबद्दल उत्सुकता असली तरी, मोठ्या प्रभागांमुळे यशापयशाचे गणित कसे असेल, यावर विद्यमान नगरसेवकांमध्येच मतभिन्नता दिसून आली. काहींच्या मते मोठे प्रभाग चांगले, तर काहींच्या मते ते अडचणीचे ठरणार आहेत.

ठळक मुद्देसांगली महापालिका निवडणुकीची राजकीय गणिते बदलणारमोठ्या प्रभागांबद्दल नगरसेवकांत मतभिन्नता

सांगली : महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे सादरीकरण उद्या, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे होणार आहे. रचनेबद्दल उत्सुकता असली तरी, मोठ्या प्रभागांमुळे यशापयशाचे गणित कसे असेल, यावर विद्यमान नगरसेवकांमध्येच मतभिन्नता दिसून आली. काहींच्या मते मोठे प्रभाग चांगले, तर काहींच्या मते ते अडचणीचे ठरणार आहेत.सांगली महापालिका निवडणुकीसाठी यावेळी चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. त्यामुळे सध्याची दोन सदस्यीय प्रभाग रचना संपुष्टात येणार आहे. नव्याने नवीन चार सदस्यीय प्रभाग रचनेत प्रभागाचा विस्तार होणार असून, २२ ते २५ हजार मतदार असतील. त्यामुळे या प्रभाग रचनेबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

गेल्या दोन, अडीच वर्षांपासून निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या अनेक इच्छुकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे नाराजी आहे. मात्र, विद्यमान नगरसेवकांमध्ये यावरून मतभिन्नता दिसून येते. काहींनी चार सदस्यांच्या प्रभागामुळे प्रचार करणे व निवडणुकीच्या खर्चात कपात करणे शक्य होणार आहे, तर काहींच्या मते मोठ्या प्रभागांमुळे घोडेबाजाराला अधिक चालना मिळेल.दरवर्षी महापालिकेच्या निवडणुकीतील घोडेबाजार ठरलेला असतो. यावरून उघडपणे राजकीय पक्ष एकमेकांवर आरोपही करीत असतात. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या आकाराचे प्रभाग होणार आहेत. त्यामुळे प्रचाराचे, यशाचे आणि खर्चाचे गणित कसे राहील, याचा कोणालाही अंदाज नाही. तरीही प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे तर्कवितर्क मांडले आहेत. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली