शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-पेठ रस्त्याचा प्रश्न: गडकरींनी सहाशे कोटीचा नारळ फोडला, तरीही मुहूर्त लांबला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 19:01 IST

आता काम पावसाळ्यानंतरच

सांगली : दहा वर्षांपासून रेंगाळलेला पेठ ते सांगली रस्त्याचा प्रश्न केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी सोडविला म्हणून अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गडकरींच्या हस्तेच आष्टा येथे सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा नारळ फोडण्यात आला. महिन्यात काम मार्गी लागणार होते, पण नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा कामाला मुदतवाढ दिल्याने हे काम लांबणीवर गेले आहे. सतत दहा वर्षे निधी मंजुरीच्या वेगवेगळ्या घोषणा करुनही हे काम मार्गी लागत नसल्याने नव्या निविदेच्या प्रक्रियेबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.सांगली-पेठ रस्त्याच्या प्रश्नावर अनेक आंदोलने झाली. देशभरात या खराब रस्त्याची चर्चा झाली. राज्य शासनाकडील हा रस्ता भाजप सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्याची घोषणा २०१७ मध्ये केली. प्रत्यक्ष हा रस्ता वर्ग होण्यासाठी २०२२ उजाडावे लागले. प्रत्येक कामात अशी दिरंगाई होतच राहिली. कधी पॅचवर्क, कधी काँकिटीकरण, तर कधी मजबुतीकरणाच्या नावावर निधी मंजूर केला गेला.

निविदाही प्रसिद्ध झाल्या. प्रत्यक्षात या रस्त्यावरचा एक दगडही हलला नाही. केलेले पॅचवर्क कधीही दहा दिवसांवर टिकले नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघात व्हायचे तसे होत राहिले व लोकांचे जीव जात राहिले. दीड महिन्यापूर्वी याच रस्त्यासाठी ५९६ कोटी २९ लाख रुपयांच्या चौपदरीकरण कामाची निविदा प्रसिद्ध झाली. आता याच निविदा कामास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

निविदेची सध्यस्थिती कायरस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच १७ जानेवारीस निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या कामासाठी १० मार्च २०२३ पर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत होती. १३ मार्चला निविदा उघडण्यात येणार होत्या. प्रत्यक्षात सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशी केल्यानंतर निविदेला महिन्याची मुदतवाढ दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.आता काम पावसाळ्यानंतरचमुदतवाढीमुळे निविदा प्रक्रिया निश्चित होण्यास एप्रिलचा पहिला पंधरवडा जाणार आहे. त्यानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईपर्यंत पावसाळा लागणार. या कामासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. पावसाळ्यात रस्त्याचे काम करता येत नसल्याने पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरमध्येच मुहूर्त लागू शकतो.

टॅग्स :Sangliसांगलीroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरी