शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सांगली : आमची लायकी कधीच सिद्ध झालीय : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 15:36 IST

आमची व अन्य भाजप नेत्यांची लायकी जनतेने कधीच मतदानातून सिद्ध केली आहे. भविष्यातील निवडणुकीतही ती सिद्ध होईल. त्यामुळे गोपिचंद पडळकर यांनी केलेले आरोप अदखलपात्र आहेत, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआमची लायकी कधीच सिद्ध झालीय : संजयकाका पाटीलगोपिचंद पडळकरांचे आरोप अदखलपात्र

सांगली : आमची व अन्य भाजप नेत्यांची लायकी जनतेने कधीच मतदानातून सिद्ध केली आहे. भविष्यातील निवडणुकीतही ती सिद्ध होईल. त्यामुळे गोपिचंद पडळकर यांनी केलेले आरोप अदखलपात्र आहेत, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी भाजपमध्ये एकही नेता लायकीचा नसल्याची टीका केली होती. त्याबद्दल संजयकाका पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यात चार आमदार, एक खासदार, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका अशा प्रत्येकठिकाणी जनतेने आम्हाला सत्तेवर बसवून आमची लायची सिद्ध केली आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीतही पुन्हा जनता आमची लायकी सिद्ध करणार आहे. त्यामुळे जनताच प्रत्येकाची लायकी ठरवित असते, ती कोणी नेत्याने ठरवायची नसते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, आरोप-प्रत्यारोप करीत बसू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करा. त्यानुसार आम्ही फक्त जनतेच्या हिताची विकासकामे करतो. विकासकामे करताना कधीही मी राजकारण आणलेले नाही. त्यामुळे जनतेचे माझ्यावरील प्रेम आजही कायम आहे.

राज्याचे दिग्गज नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत मला देशात उच्चांकी मतांनी निवडून आणण्याचा संकल्प करीत माझ्या कर्तृत्वाची पक्षातूनही पोहोचपावती दिली आहे. मी लोकसभा निवडणूक लढणार आहे, हे यातून स्पष्टच आहे. काँग्रेसकडून आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी ते लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले आहे. अजून कोणी विरोधक ठरलेला नाही. या गोष्टी जेव्हा निश्चित होतील तेव्हा याबाबत जास्त सविस्तर बोलता येईल.पडळकर यांची नाराजी नेमकी कशामुळे आहे, हे मला माहित नाही. ते माहिती करून घेण्याची गरज नाही. त्यांनी नक्कीच गैरसमज करून घेतला आहे. तो दूर करणे आमचे काम नाही, कारण गैरसमज ज्याचे त्याने दूर करायचे असतात. मला विक्रमी मतांनी निवडून आणण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे ते नाराज झालेत, की माझे सर्व पक्षात मित्र आहेत, म्हणून नाराज झालेत, याची कोणतीही कल्पना नाही.

मला अनेक राष्टÑवादी, काँग्रेस नेत्यांनी गत लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे त्यांच्या ऋणात राहून जनहिताच्या कामांत मदत करावी लागते. त्यातून जर कोणी दुखावले असेल, तर त्याला नाईलाज आहे. जेव्हा त्यांचे हे गैरसमज दूर होतील, तेव्हा खुप उशिर झालेला असेल. अर्थात त्यांनी पक्षाशीच संबंध नाही म्हटल्यावर त्यांची दखल घेण्याची किंवा गैरसमज दूर करण्याची गरजच नाही.वैयक्तिक वाद कोणाशीही नाही!माझे वैचारिक मतभेद कोणाशीही असू शकतात, पण वैयक्तिक वाद कोणाशीही नाही. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये मी कधीही आ. सुमनताई पाटील यांच्या विकासकामांच्या आड आलो नाही. त्यांनीही तसे राजकारण कधी माझ्याबरोबर केले नाही. अजितराव घोरपडे यांच्याशीही कधीही वैयक्तिक वादाचा विषय आला नाही, असे संजयकाका पाटील म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली