शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सांगली : आचाऱ्याच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप, आरोपी मध्य प्रदेशचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 16:12 IST

दारुसाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरुन महादेव चव्हाण (वय ६०, रा. बेळगाव) याचा खून केल्याप्रकरणी आरोपी सत्यनारायणदास रामदाससिंग भदोरीया (वय ५६, रा. खलीलपूर, मध्य प्रदेश) यास दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विरेंद्र बिष्ट यांनी शनिवारी हा निकाल दिला.

ठळक मुद्देमिरज रेल्वेस्थानकातील घटनेचा निकालदारुसाठी पैसे दिले नाहीत या कारणावरुन खून

सांगली : दारुसाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरुन महादेव चव्हाण (वय ६०, रा. बेळगाव) याचा खून केल्याप्रकरणी आरोपी सत्यनारायणदास रामदाससिंग भदोरीया (वय ५६, रा. खलीलपूर, मध्य प्रदेश) यास दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विरेंद्र बिष्ट यांनी शनिवारी हा निकाल दिला.मृत महादेव चव्हाण व भदोरिया हे दोघे मिरजेत एकत्रित आचारी काम करीत होते. दोघांनाही दारुचे व्यसन होते. ते दररोज एकत्रित दारु पिण्यास जात असे. दि. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी चव्हाण हा मिरजेतील हॉटेल कोहिनूरमध्ये काम करीत होता. त्यावेळी भदोरिया याने त्यास हॉटेल बाहेर बोलावून घेतले.

दारु पिण्यास जाऊ, असे सांगून भदोरिया याने चव्हाणला मिरज रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर नेले. तिथे ते एका बाकड्यावर बोलत बसले होते. भदोरिया याने चव्हाणकडे दारु पिण्यास पैशाची मागणी केली. चव्हाणने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे भदोरियाला राग आला. त्याने खिश्यातील चाकू काढून चव्हाणच्या पोटावर, छातीवर वार केले होते. यामध्ये चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मरण पावला होता.मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन भदोरिया यास अटक केली होती. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी या खटल्याचे काम पाहिले. सरकारतर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सतीश लोंढे, फिर्यादी प्रकाश कुंभार, पंच अमित कांबळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. गेल्या काही दिवसापून या खटल्याचे काम सुरु होते. त्याचा शनिवारी निकाल लागला.प्रवाशांची आरडाओरडभदोरिया याने चव्हाण हल्ला केल्यानंतर स्थानकातील प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली होती. हा प्रकार पाहून स्थानकात ड्युटीवर असलेले मिरज रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रकाश कुंभार यांनी धाव घेतली. तेवढ्यात भदोरिया हा पळून गेला होता. कुंभार याने त्यास पाठलाग करुन पकडले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदिवे व चंद्रकांत भोसले यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.

टॅग्स :MurderखूनSangliसांगलीCourtन्यायालय