शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

सांगली महापालिका निवडणूक : ७८ जागांसाठी ४५० उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 16:16 IST

सांगली महापालिकेसाठी अर्ज माघारीसाठी शेवटच्या दिवशी अपक्षांसह तब्बल ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत.

ठळक मुद्देसांगली महापालिकेसाठी ७८ जागांसाठी ४५० उमेदवार रिंगणातपक्षांना बंडखोरीची लागण, अनेक प्रभागात चौरंगी बहुरंगी लढती

सांगली :  महापालिकेसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अपक्षांसह तब्बल ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे. अनेक प्रभागात चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार आहे.सांगली महापालिकेसाठी १ आॅगस्टसाठी मतदान होणार असून निवडणूकीसाठी मुदतीमध्ये ११२८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत सुमारे १५३ अर्ज अवैध ठरले होते. मंगळवारी दुपारी तीनपर्यँत अंतीम मुदत होती.

या मुदतीत ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांना बंडखोरीची लागण झाली असून बंडखोरी थोपवण्यात नेत्यांना अपयश आल्याचे स्प्ष्ट झाले असून यामुळे अनेक प्रभागात चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार आहेत.अनेक प्रभागात बंडखोरीउमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापयत बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारावर दबाब आणला, मात्र अनेक प्रभागात बंडखोर थंड झाले नसल्याचे स्प्ष्ट झाले आहे.काँग्रेसला प्रभागात ९ मधून मदनभाऊ गटाचे निष्टावंत अतुल माने, भूपाल उफर् बंडू सलगर, राष्ट्रवादीच्या वृषाली पाटील, जन्नत मिरजे(कुरणे) प्रभाग १० मधून भाजपचे नरेंद्र् तोषणीवाल, काँग्रेसच्या प्रियंका मिराजदार, राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका माधुरी कलगुटगी, काँग्रेसचे अशोक मासाळे यांनी बंडखोरी केली आहे.

प्रभाग ११ मधून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विलास सजे, काँग्रेसचे आनंदा लेंगरे, अशोक म्हरूगडे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शीतल पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष गोयकर आदींनी बंडखोरीचे निशाण कायम ठेवले आहे.

प्रभाग १६ मधून काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक राजेश नाईक, असिफ बावा, उमर गवंडी, प्रभाग १९ मधून काँग्रेसचे अलका एेवळे, अनिता आलदर, अजय देशमुख, महेश कणे यांनी स्वतंत्र पॅनेल केले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली