शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Election तीनच उमेदवारांना मतदान करून मतदार गायब, मिरजेत प्रभाग चारमध्ये घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 17:10 IST

Sangli Election मिरजेत प्रभाग क्रमांक चारमध्ये एका मतदान केंद्रात तीनच उमेदवारांना मतदान करून मतदार गायब झाला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने यंत्र मध्येच थांबल्याने मतदारास शोधून आणून मतदान करण्यास भाग पाडण्यात आले. अर्धवट मतदानामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.

ठळक मुद्देतीनच उमेदवारांना मतदान करून मतदार गायबमिरजेत प्रभाग चारमध्ये घटना निवडणूक कर्मचाऱ्यांची धावपळ

मिरज : मिरजेत प्रभाग क्रमांक चारमध्ये एका मतदान केंद्रात तीनच उमेदवारांना मतदान करून मतदार गायब झाला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने यंत्र मध्येच थांबल्याने मतदारास शोधून आणून मतदान करण्यास भाग पाडण्यात आले. अर्धवट मतदानामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.बुधवारी सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर औद्योगिक वसाहतीत कामगार असलेला मतदार आयडियल इंग्लिश स्कूल शाळेतील मतदान केंद्रात तीन उमेदवारांना मतदान करून चौथ्या उमेदवारासमोरील बटण न दाबताच मतदान केंद्राबाहेर निघून गेला.

केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी चारवेळा बीपचा आवाज न ऐकताच त्यास बाहेर जाऊ दिले. चार गटात चारवेळा बटण दाबल्याशिवाय मतदान प्रक्रियाच पूर्ण होत नसल्याने मतदान यंत्र बंद न पडता तसेच सुरू राहिले. ही चूक लक्षात आल्यानंतर मतदान केंद्रातील कर्मचारी व पोलिसांनी संबंधित मतदाराचा शोध घेऊन मतदान केंद्राबाहेरून त्यास पुन्हा मतदान केंद्रात आणले. तोपर्यंत केंद्राबाहेर मतदानासाठी मोठी रांग लागली.

या घटनेमुळे रांगेतील मतदारांना काही काळ ताटकळावे लागले. पर्यायी व्यवस्था म्हणून नव्या मतदान यंत्राच्या व्यवस्थेसाठी तयारी सुरू झाली. सबंधित मतदाराने मतदान केंद्रात येऊन चौथे मतदान केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.

मतदान कर्मचाऱ्यांनीही मतदान पूर्ण झाल्याची खात्री केल्याशिवाय मतदाराला बाहेर जाऊ दिले. मतदान प्रक्रियेबाबत अपुरी माहिती असल्याने संबंधित मतदाराबाबत हा प्रकार घडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता कुलकर्णी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकSangliसांगलीElectionनिवडणूक