शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका बंद करणार थकबाकीदारांच्या सुविधा, वसुलीसाठी प्रशासनाची कडक मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:40 IST

प्रशासनाने कर वसुलीसाठी दुकाने सील करण्याची कारवाई सुरू केली

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कराच्या थकीत वसुलीसाठी प्रशासनाने कडक मोहीम आखली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ता कराची ९४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. जप्तीच्या कारवाईसह आता संबंधित थकबाकीदारांच्या नागरी सुविधा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.महापालिकेने ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या २ हजार ९५ मालमत्ताधारकांना आणि ५ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ३४ हजार १९५ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या आहेत. निर्धारित मुदतीपर्यंत कर न भरल्यास संबंधित मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. आवश्यक असल्यास लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच, काही थकबाकीदारांच्या पाणीपुरवठ्यासह अन्य नागरी सुविधा तात्पुरत्या बंद करण्याचीही तयारी करण्यात आली आहे.महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार भागनिहाय जप्ती व वसुली पथके तयार करण्यात आली आहेत. प्रशासनाने कर वसुलीसाठी दुकाने सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. नागरी सेवा आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध न झाल्याने ही कठोर कारवाई अपरिहार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कर थकबाकीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी त्वरित थकीत रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अन्यथा जप्तीची अप्रिय कार्यवाही टाळता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

थकबाकीचा डोंगर वाढला

  • थकबाकी : ९४ कोटी
  • चालू मागणी : ७४ कोटी
  • एकूण उद्दिष्ट : १६८ कोटी
  • एकूण वसुली : ४० कोटी