सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे २०२०-२१ चे ६७५.२३ कोटी जमेचे व ५८ लाख शिलकीचे अंदाजपत्रक आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी स्थायी समितीसमोर सादर केले. कुपवाड ड्रेनेज योजना, महापालिका इमारतींच्या दुरुस्तीसह, स्वच्छ व हरित सांगलीचा संकल्पही प्रशासनाने अंदाजपत्रकाद्वारे केला आहे.महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती संदीप पोटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत आयुक्त कापडणीस यांनी यंदाचे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते.अंदाजपत्रकात चार प्रभाग समिती क्षेत्रातील खुल्या जागा, भूखंड, भू भाडे व मनपाच्या इतर जागांमध्ये शुल्कवाढ, उद्यान विभागाकडील कर, शुल्कामध्ये दरवाढ, अग्निशमन, पाणीपुरवठा, आरोग्य, मालमत्ता विभागाकडील विविध शुल्कात वाढ करण्यात आल्याने २५ ते ३० कोटीचे उत्पन्न वाढणार आहे. उपयोगकर्ता करामुळे यंदा तीन ते चार कोटींचे जादा उत्पन्न मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.प्रस्तावित कुपवाड ड्रेनेज योजनेचा आराखडा अंतिम टप्पात असून लवकरच शासनाला सादर केला जाईल. मनपाची मुख्य इमारत उभारण्याचा संकल्पही आयुक्तांनी केला आहे. घनकचरा व्यवस्थापन, प्रतापसिंह उद्यानात कृत्रिम प्राणीसंग्रहालय, शहरात नवीन नाट्यगृह, वायू प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कृती आराखडा, माळबंगला येथे संरक्षक भिंत, मिरज पाणीपुरवठासाठी नवीन कार्यालय, सांगली, मिरजेत नवीन अग्निशमन कार्यालय, फायर स्टेशन विकसित करणे, रहदारीच्या चौकात डिजिटल सिग्नल, कृष्णा नदी प्रदूषणमुक्ती असे विविध संकल्प सोडण्यात आले आहेत. हे संकल्प करताना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक विकास निधीला मात्र कात्री लावली आहे.
सांगली महापालिकेचे ६७५ कोटींचे अंदाजपत्रक सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:07 IST
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे २०२०-२१ चे ६७५.२३ कोटी जमेचे व ५८ लाख शिलकीचे अंदाजपत्रक आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी स्थायी समितीसमोर सादर केले. कुपवाड ड्रेनेज योजना, महापालिका इमारतींच्या दुरुस्तीसह, स्वच्छ व हरित सांगलीचा संकल्पही प्रशासनाने अंदाजपत्रकाद्वारे केला आहे.
सांगली महापालिकेचे ६७५ कोटींचे अंदाजपत्रक सादर
ठळक मुद्देसांगली महापालिकेचे ६७५ कोटींचे अंदाजपत्रक सादर कुपवाड ड्रेनेज योजना, महापालिका इमारतींच्या दुरुस्तीसह, स्वच्छ व हरित सांगलीचा संकल्प