शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका घोटाळ्यातील रकमेची वसुली होणार; तत्कालीन नगरसेवक, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 13:36 IST

महापालिकेच्या सन २००५ ते २०१० काळातील विशेष लेखा परीक्षणात विविध कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

सांगली : महापालिकेच्या सन २००५ ते २०१० काळातील विशेष लेखा परीक्षणात विविध कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या गैरव्यवहार प्रकरणात संबंधित पदाधिकारी, नगरसेवक व तत्कालीन अधिकाऱ्यांवर वसुलीची कारवाई करण्याची शिफारस लेखा परीक्षकांनी केली होती. त्याची अमंलबजावणी प्रशासनाने सुरू केली असून तत्कालीन पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांवर रक्कम वसुलीच्या कारवाईसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे.महापालिकेत गैर कारभाराविषयी शासनाकडे तक्ररी करण्यात आल्यानंतर पालिकेचे २००५ ते २०१० या कालावधीचे विशेष शासकीय लेखा परीक्षण करण्यात आले. या लेखा परीक्षणात पालिकेतील विविध कामात गैरव्यवहार झाल्याचे, तसेच अनियमितता, बेकायदेशीर कामे झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लेखा परीक्षकांनी याप्रकरणी जबाबदारी निश्चित करून संबंधितांकडून या रकमा वसूल करणे आवश्यक असल्याची शिफारस शासनाकडे केली होती. गेली काही वर्षे हा अहवाल शासन दरबारी पडून होता. याप्रकरणी कारवाई होत नसल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.न्यायालयाने तातडीने सदर घोटाळ्याची जबाबदारी निश्चित करून वसुली करण्याचे आदेश शासनास दिले. शासनाने याप्रकरणी प्रशासन जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले. पण, पालिका प्रशासनानेही काहीही कारवाई केली आहे. त्यामुळे न्यायालयात पुन्हा अवमान याचिका दाखल करण्यात आली. आयुक्त नितीन कापडणीस यांनी काही दिवसांपूर्वी तत्कालीन पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून शासनाकडे अहवाल पाठवला आहे. त्यामुळे या कोट्यवधींच्या घोटाळ्याची वसुली लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sangliसांगली