शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
4
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
5
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
6
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
7
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
8
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
9
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
10
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
11
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
12
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
13
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
14
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
15
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
16
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
17
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
18
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
19
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
20
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?

ठेकेदारांत स्पर्धा झाली अन् सांगली महापालिकेचे तीन कोटी वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:23 IST

महापालिकेच्या स्थायी सभेत मंजुरी : १४ कोटींच्या विविध कामांसाठी २० ते ४० टक्के कमी दराने निविदा

सांगली : महापालिका क्षेत्रातील विविध कामांच्या निविदांबाबत सातत्याने मॅनेजचा आरोप होत असतो. मात्र, नुकतीच १४ कोटींच्या कामांसाठी मागवलेल्या निविदा २० ते ४० टक्के कमी दरांनी आल्याने महापालिकेला दोन ते अडीच कोटी रुपये बचत झाली. या निविदांना स्थायी समितीच्या सभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली.महापालिकेत सोमवारी प्रशासकीय महासभा व स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी होते. तसेच अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, निखिल जाधव, स्मृती पाटील यांसह खातेप्रमुख उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील डांबरीकरण, काँक्रिटीकरण आणि विविध साहित्य खरेदीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदांसाठी ठेकेदारांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाली. पहिल्यांदाच मोठ्या संख्येने ठेकेदारांनी भाग घेतला, परिणामी या १४ कोटींच्या निविदा २० ते ४० टक्के कमी दराने आल्या. याच निविदांच्या दरमान्यतेसंबंधी विषय सभेसमोर उभे होते आणि त्याला मंजुरी देण्यात आली. यामध्ये कर्मवीर चौक ते प्रबोधनकार ठाकरे चौकापर्यंत पेव्हिंग ब्लॉक फूटपाथ करणे, पोरेज टीव्हीएस शोरूम ते शासकीय विश्रामगृहापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पेव्हिंग ब्लॉक रस्ता व फूटपाथ करण्याच्या कामांचा समावेश होता.सभेत मानधन कर्मचाऱ्यांसाठी मुदतवाढ, तसेच नवीन दहा ट्रॉलीमाऊंटेड दहा सिटर टॉयलेट युनिट खरेदी करण्यास देखील मान्यता देण्यात आली. याशिवाय महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये सोलर ऑपरेटेड आयओटी स्किल डेव्हलपमेंट लॅब विकसित करण्यासाठी २.५० कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता प्रदान करण्यात आली.