शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेची सभा भानगडीच्या टीकेमुळे तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:15 IST

Muncipal Corporation Sangli - सांगली महापालिकेच्या ऑनलाईन सभेत भानगडीचे विषय घेतले जात असल्याची टीका होत आहे. या आरोपामुळे महापालिका व नगरसेवकांची बदनामी होते. त्यामुळे ऑनलाईन सभा तहकूब करून ऑफलाईन सभा घ्यावी, अशी मागणी सर्वच पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी केली. त्यानुसार महापौर गीता सुतार यांनी ऑनलाईन महासभा तहकूब करून २३ डिसेंबर रोजी पुन्हा सभा घेण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देसांगली महापालिकेची सभा भानगडीच्या टीकेमुळे तहकूबऑफलाईन सभेची मागणी : सर्वपक्षीय सदस्यांचा आग्रह

सांगली : महापालिकेच्या ऑनलाईन सभेत भानगडीचे विषय घेतले जात असल्याची टीका होत आहे. या आरोपामुळे महापालिका व नगरसेवकांची बदनामी होते. त्यामुळे ऑनलाईन सभा तहकूब करून ऑफलाईन सभा घ्यावी, अशी मागणी सर्वच पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी केली. त्यानुसार महापौर गीता सुतार यांनी ऑनलाईन महासभा तहकूब करून २३ डिसेंबर रोजी पुन्हा सभा घेण्याचे आदेश दिले.

या कालावधित शासनाकडून ऑफलाईन सभेचा आदेश न आल्यास ऑनलाईन सभाच होईल, असेही स्पष्ट केले. कोरोनामुळे शासनाने महापालिकेला ऑनलाईन महासभा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या दोन सभा ऑनलाईन झाल्या.

या सभेत उपसूचनेव्दारे बंद जकात नाके भाडयाने देणे, भूखंडावरील आरक्षणे उठवण्याचा विषय घुसडण्यात आले होते. या भानगडीविरोधात कृती समितीने आंदोलनही छेडले. ऑनलाईनमुळे सत्ताधाऱ्यांना टीकेला सामोरे जावे लागले.गुरुवारी महासभा सुरू होताच विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील, वहिदा नायकवडी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, विष्णू माने यांनी ऑनलाईन महासभा तहकूब करण्याची मागणी केली. संतोष पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला ऑफलाईन सभा घेण्याचे पत्र शासनाने दिले आहे.

महापालिकेलाही ते लवकरच मिळेल. त्यामुळे ही तहकूब करण्याची मागणी केली. भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी ऑनलाईन सभेत भानगडी होत असल्याचा आरोप फेटाळला. आम्हीही ऑफलाईन सभा घेण्यास तयार आहे. याबाबतचा निर्णय महापौरांनी घ्यावा, असे स्पष्ट केले.. स्वाती शिंदे, गजानन मगदूम यांनी मात्र ऑनलाईन सभा तहकूब करू नये, अशी भूमिका घेतली. महापौर सुतार यांनी ऑनलाईन सभा तहकूब करून पुन्हा २३ डिसेंबर रोजी सभा होईल, असे सांगितले.आघाडीने पत्र आणावेराज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांनी नेत्यांकडे पाठपुरावा करून ऑफलाईन सभेबाबत आदेश आणावेत. शासनाने आदेश दिल्यास सभा सभागृहात घेण्यात येईल, असे भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी सांगितले.‍सभेत अडथळेऑनलाईन सभेत अनेक तांत्रिक अडथळे येत होते. काही सदस्यांना बोललेले ऐकू जात नव्हते, तर काहींचे बोलणे ऐकू येत नव्हते. रेंजची समस्या येऊ लागल्याने शेखर इनामदार यांनी तर विनायक सिंहासनेंच्या मोबाईलवरून सभेत हजेरी लावली होती.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली