शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
5
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
7
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
8
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
9
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
10
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
11
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
12
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
13
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
14
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
15
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
16
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
17
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
18
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
19
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
20
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला

सांगली महानगरपालिकेत महापौेर राष्ट्रवादीचा,भाजपला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 13:27 IST

Muncipal Corporation Mayor elecation sangli- सांगली महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने झाली. ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. महापौेर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.

ठळक मुद्देसांगली महानगरपालिकेत महापौेर राष्ट्रवादीचाभाजपला धक्का, आघाडीत फुट

सांगली : महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने झाली. ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. महापौेर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात आली.

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका महापौरपदी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली आहे. दिग्विजय यांना ३९ तर विरोधी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते पडली आहेत, उपमहापौर पदी काँग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन मतदान झाल्याने याबद्दल उत्सुकता होती.

भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात 

  • एकूण मतदार : ७८
  • मयत सदस्य : १
  • मतदार  : ७७
  • तटस्थ मतदार :२ 
  • दिग्विजय सूर्यवंशी :३९
  • धीरज सूर्यवंशी :३६

सांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरु झाली. त्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीनेच झाल्याने असल्याने सभागृहात नगरसेवकांची उपस्थिती बंधनकारक नव्हती.

महापौर पदासाठी निवडणूकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी व भाजपचे धीरज सूर्यवंशी यांच्यात लढत होती. राष्ट्रवादीचे उमेदवार मैनुद्दीन बागवान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता, पण दिग्विजय सूर्यवंशी यांचा अर्ज कायम ठेवला. पीठासन अधिकाऱ्यांकडून मतांची नोंदणी झाल्यानंतरच प्रकीया पूर्ण केली.

भाजपच्या विजय घाडगे, महेंद्र सावंत यांनी आघाडीला मतदान केले, तर स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसिमा नाईक या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. रईसा रंगरेज गैरहजर राहील्या. पीठासन अधिकाऱ्यांनी महापौर म्हणून दिग्विजय सूर्यवंशी यांना विजयी घोषित केले.

भाजपचे महापौर पदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला असून जे उमेदवार ऑनलाइन दिसत नाही त्यांचे मतदान कसे होणार? ही प्रक्रिया बरोबर नाही अशा आरोप धीरज सूर्यवंशी यांनी केला आहे.कोरोनामुळे महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व्यवस्था केली होती. नगरसेवकांना सभेपूर्वी अर्धा तास लिंक पाठविली होती. सभेपूर्वी सर्वजण लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरSangliसांगलीElectionनिवडणूक