शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिका प्रभारी आयुक्त पदावरून पाठशिवणीचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:32 IST

महापालिका आयुक्त पदावर वर्णी कुणाची?

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपूरला बदली आहे. या रिक्त पदावर प्रभारी आयुक्त पदावर दोन अधिकाऱ्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ शुक्रवारी पाहिला मिळाला.

शुक्रवारी प्रभारी आयुक्त म्हणून नीलेश देशमुख यांचा आदेश शासनाकडून आला होता. त्यांनी सकाळी महापालिकेचा अर्थसंकल्पही सादर केला. सायंकाळी प्रभारी आयुक्त म्हणून रवींद्र अडसूळ यांच्या नावाचा आदेश महापालिकेत आला. त्यानंतर त्यांनी पदभारही स्वीकारला.आयुक्त शुभम गुप्ता यांच्याविरोधात त्यांच्या कारभाराबद्दल नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्याही तक्रारी होत्या. या तक्रारींची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन त्यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव या पदावर नियुक्ती केली आहे. त्यानंतर आयुक्त पद रिक्त राहिले आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र अडसूळ यांना प्रभारी आयुक्त म्हणून संधी मिळणे गरजेचे होते. पण, अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख यांना महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून संधी मिळाली होती. यावरून महापालिका क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगली होती. सकाळी महापालिकेचा अर्थसंकल्पही प्रभारी आयुक्त नीलेश देशमुख यांनी सादर केला होता. त्यानंतर शासनाकडे वेगवान घडामोडी घडल्यानंतर सायंकाळी रवींद्र अडसूळ यांची प्रभारी आयुक्त म्हणून वर्णी लागली.

महापालिका आयुक्त पदावर वर्णी कुणाची?गुप्ता यांच्या बदलीनंतर आता महापालिकेचे नवीन आयुक्त कोण असणार, याकडे लक्ष लागले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, भालचंद्र गोसावी तसेच वैद्य या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. या तीन अधिकाऱ्यांशिवाय वेगळेच नावही आयुक्तपदासाठी पुढे येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. एका महिला आयएएस अधिकारी यांचेही नाव चर्चेत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्त