शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

मुकाबला पुराचा..आराखडा तयार सांगली महापालिकेचा; सर्व यंत्रणा सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:34 IST

प्रशासन सज्ज : निवारा केंद्र, बोटी, लाईफ जॅकेटस् अन् पथके तैनात

सांगली : पूर येण्यापूर्वीच महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन त्यानुसार पावले उचलण्यास सुरुवात केल्यामुळे पूरपट्ट्यातील नागरिकांना मदत मिळत आहे. स्थलांतराच्या सोयीसह निवारा केंद्र तसेच महापूर आला तर बोटी, लाईफ जॅकेटस्, बचाव पथके आदींची सज्जता झाली आहे. पूरपट्ट्यात येणाऱ्या नागरिकांनी भीती न बाळगता सतर्क राहून महापालिकेच्या या यंत्रणेचा उपयोग करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.सांगली व मिरजेत सध्या कृष्णा नदी पात्राबाहेर पडत आहे. सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ३४ फुटांच्या घरात गेल्यामुळे नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. मिरजेच्या कृष्णा घाट परिसरातील नागरिकांनीही स्थलांतरास सुरुवात केली आहे. पाणीपातळी किती वाढेल, याचा अंदाज अद्याप कोणालाही नाही. तरीही महापूर आला तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

महापालिकेकडील साधनेअग्निशमन वाहने ७रेस्क्यू व्हॅन  १लॅडर (३५ फूट उंच) ८मोठ्या फायबर बोटी ४लहान फायबर बोटी २रबर बोट  १ओ.बी.एम. मशीन १३पेट्रोल चेन सॉ १४बी. ए. सेट  ५लाईफ जॅकेट ९००लाईफ रिंग  १७दोर बंडल  ४हेल्मेट   ५४गमबूट  ७६रिफ्लेक्टर जॅकेट ४०अग्निशमन उपकरणे २४अस्का लॅम्प  २मेगा फोन   २कॉम्बी टूल्स   २मिनी मोबाईल टॉवर ४प्रॉक्सिमेटी सूट ४बॉडी कव्हर बॅग १०पूर प्रसारण नियंत्रण २

प्रमुख अग्निशमन अधिकारी १जवान  ५१(लॅडर : उंच किंवा अडचणीच्या ठिकाणी अडकलेल्यांना वाचविण्याचे यंत्रबी. ए. सेट : ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी वॉर्निंग देणारे यंत्र)

सांगलीतील महापूरवर्ष - सर्वोच्च पातळी

  • २००५ - ५३.९ फूट
  • २०१९ - ५७.६ फूट
  • २०२१ - ५४.१० फूट

मिरजेतील महापूरवर्ष    - सर्वोच्च पातळी

  • २०१९ - ६९ फूट
  • २०२१- ६५ फूट

२०१९ मध्ये पाणी आलेले प्रभागसांगली : वॉर्ड क्र. १०, १२, १३, १४, १५, १६, १८ (एकूण ७)मिरज : वॉर्ड क्र. ५, ७, २० (एकूण ३)बाधित घरे : २९,२८३बाधित लोकसंख्या : १,७०,५११निवारा केंद्रे : ६६

मदत व बचाव कार्य कक्ष  -  अग्निशमन दल संपर्क क्रमांकटिंबर एरिया, सांगली - ०२३३-२३७३३३३स्टेशन चौक, सांगली -०२३३-२३२५६१२कमानवेस, मिरज - ०२३३-२२२२६१०

आपत्ती व्यवस्थापन कक्ष व संपर्क७०६६०४०३३०७०६६०४०३३१७०६६०४०३३२

पाच बोटिंग क्लब सज्जसांगलीतील रॉयल कृष्णा बोट क्लब, तरुण मराठा बोट क्लब, जयंत रेस्क्यू फोर्स, विश्वसेवा फाऊंडेशन, विसावा मंडळ बोट क्लब यांची यंत्रणाही सज्ज आहे.

महापालिकेचे एकूण दवाखाने २१वस्तीस्तरीय संघ ४६निवारा केंद्रे  ६६

हे ॲप डाऊनलोड करामहापालिकेने ‘आपत्ती मित्र’ (apatti mitra) तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर ते उपलब्ध आहे. यावर नदी पाणी पातळीची तासाला अचूक माहिती, कोयना व अलमट्टी धरणातील साठ्याची माहिती, बाधित होणारे क्षेत्र, तात्पुरते निवारा केंद्र, सर्व शासकीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक, आराखडा अशी सर्व प्रकारची माहिती मिळते. ॲपद्वारे मदतही मागता येऊ शकते.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर