शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीनशे कोटींच्या भूखंडांवर अखेर सांगली महापालिकेचे लागलं नाव, भूखंड पडले होते बेवारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:54 IST

अजूनही ६५ भूखंडांचे प्रस्ताव नगर भूमापन कार्यालयाकडे प्रलंबित

सांगली : महापालिकेच्या मालकीचे कोट्यवधी रुपयांचे भूखंड बेवारस पडले होते. गेल्या वर्षभरात ८४ भूखंडांना महापालिकेचे नाव लावण्यात यश आले आहे. अजूनही ६५ भूखंडांचे प्रस्ताव नगर भूमापन कार्यालयाकडे प्रलंबित आहे. जवळपास साडेतीनशे कोटींची मालमत्ता अखेर महापालिकेच्या ताब्यात आली आहे.महापालिका क्षेत्रातील जवळपास १२०० हून अधिक खुले भूखंड आहेत. या भूखंडावर पालिकेची मालकी आहे; पण सातबारा उताऱ्यावर पालिकेचे नाव नसल्याने यातील अनेक भूखंडांचा बाजार झाला आहे. मूळ मालकाच्या नावावर अनेक भूखंड कायम आहेत. या भूखंडाची खुलेआम विक्री केली जात आहे. याबाबत महासभेत अनेकदा चर्चा झाली. खुल्या भूखंडाला कंपाउंड घालणे, फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले; पण त्यातील एकही गोष्ट प्रशासनाने केली नाही.भूखंडाचा बाजार रोखण्यासाठी निवृत्त तहसीलदार शेखर परब यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. नगर भूमापन विभागाचा अनुभव असलेल्या परब यांनी वर्षभरात ८५ खुल्या भूखंडांना महापालिकेचे नाव लावून घेण्यात यश मिळविले आहे. हनुमाननगर येथील १६ एकरांच्या भूखंडालाही महापालिकेचे नाव नव्हते. वड्डी हद्दीतील ५२ एकरांच्या भूखंडाबाबतही हीच स्थिती होती. गेल्या साठ वर्षांपासून हे भूखंड महापालिकेच्या नावावर नव्हते. परब यांनी प्रयत्न करून या भूखंडांना महापालिकेचे नाव लावले.

महापालिकेने सध्या ६५ भूखंडांना नाव लावण्याचा प्रस्ताव नगर भूमापन कार्यालयाकडे पाठविला आहे; पण नगर भूमापन कार्यालयातील अपुरा कर्मचारी वर्ग, अतिरिक्त कामाच्या ताणामुळे नाव लावण्याची प्रक्रिया रखडली आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, भाजपच्या गटनेत्या भारती दिगडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी नगर भूमापन अधिकाऱ्यांची भेट घेऊन खुल्या भूखंडांना महापालिकेचे नाव लागण्याची मागणी केली आहे.

सुविधा कमी तरी काम जास्तमहापालिकेने खुल्या भूखंडांना लाव लावण्यासाठी महसूल विभागातील निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती केली; पण त्यांना कसल्याच सुविधा दिल्या नाहीत. सध्या एक लिपिक व एक संगणक यावर त्यांचे काम सुरू आहे. कोट्यवधीच्या मालमत्तांचा बाजार रोखणाऱ्या या विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. सध्या काॅलनी, मंजूर रेखांकनातील लोक स्वत:हून पुढे येऊन खुल्या भूखंडाची माहिती देत आहेत. त्यातूनही अनेक बेवारस भूखंडाचा शोध लागला आहे.

टॅग्स :Sangliसांगली