शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गरिबांच्या घरांचा प्रकल्प रद्द..मग श्रीमंतांना रान मोकळे का?

By अविनाश कोळी | Updated: December 20, 2023 17:46 IST

पूरपट्ट्यात दररोज नव्याने होताहेत बांधकामे

सांगली : महापालिकेने त्यांचा नियोजित २८८ घरांचा एक मोठा प्रकल्प पूरपट्ट्यात जागा आल्याने रद्द केला. गरिबांचा हा प्रकल्प रद्द केला असला तरी याच पूरपट्ट्यात दररोज अनेक श्रीमंतांनी भराव टाकून बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे, त्यांना रान मोकळे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पूरपट्ट्यात येणाऱ्या कोणत्याही बांधकामांचे रेखांकन रद्द करण्याचे अधिकार महापालिकेला असताना अशा मोठ्यांच्या बांधकामांबाबत मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.महापालिका क्षेत्रातील दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला होता. आर्थिक दुर्बल २८८ कुटुंबांसाठी सदनिका बांधण्यात येणार होत्या. जानेवारी २०१९ मध्ये महापालिकेच्या ‘डीपीआर’ला शासनाची मंजुरी मिळाली होती. मात्र, त्यानंतर २०१९ मध्ये सांगलीत कृष्णेला महापूर आला. २०२१मध्येही महापूर आला. यामुळे मंजूर घरकुलांच्या प्रकल्पाची जागा ही ब्ल्यू झोनमध्ये (पूरपट्ट्यात) आली. पूरपट्ट्यात कोणत्याही बांधकामाला परवानगी दिली जात नसल्याचा दाखला या निर्णयामागे आहे.

गृहप्रकल्पाबाबत एवढा कठोर निर्णय घेतला जात असताना ज्यांनी नियम धुडकावून पूरपट्ट्यात बांधकामे केली, त्या धनदांडग्या लोकांना मोकळे सोडण्यात आले आहे. पूरपट्टा निश्चित झाल्यानंतरही महापालिकेकडून याच भागात मोठ्या प्रमाणावर बांधकाम परवाने दिले गेले. आजही असे परवाने दिले जात आहेत. मोठमोठी गॅरेज, हॉटेल्स्, बझार, निवासी व व्यापारी संकुले यांचा विस्तार पूरपट्टा व ओतात झाला आहे.

पूरपट्टा, नाल्यावर कोट्यवधींची कमाईसांगली शहरात आजही नाल्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई केली जाते. नाल्यांच्या बफर झोनमध्ये, ओतात, पूरपट्ट्यात महापालिकेच्या परवानगीशिवाय जी बांधकामे उभी राहात आहेत, त्यांना राजकीय लोकांचा आश्रय लाभला आहे. काही आजी - माजी नगरसेवकांनीही मोठमोठे गृहप्रकल्प या क्षेत्रात उभारले आहेत. सध्या हरीपूर रोडवरील नाल्याशेजारी तसेच जुना कुपवाड रोड, विजयनगर येथील नाल्यांच्या बफर झोनमध्ये राजकीय लोकांच्या अट्टहासापोटी बांधकामे केली जात आहेत. लोकांचा विरोध डावलून ही बांधकामे होत असताना शासकीय यंत्रणा त्याकडे कानाडोळा करताना दिसताहेत.

टॅग्स :Sangliसांगली