शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेचे करवाढीविना १,११३ कोटींचे अंदाजपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:50 IST

निलेश देशमुख यांची माहिती : शहरातील मूलभूत सुविधांवर भर

सांगली : केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा आधार घेत महापालिका प्रशासनाने २०२५-२६चे तब्बल १ हजार ११३ कोटी ५२ लाखांचे कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक सादर केले. १९ कोटी ४० लाखांच्या शिलकीच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीसह इतर कोणतीही करवाढ लादलेली नाही. त्यामुळे शहरातील मूलभूत सुविधांवर भर दिल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती प्रभारी आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.महापालिकेचे २०२४-२५चे सुधारित आणि २०२५-२६चे नियोजित अंदाजपत्रक मुख्य लेखापाल अभिजित मेंगडे यांनी प्रभारी आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे सादर केले. देशमुख यांनी ते जाहीर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, स्मृती पाटील, विजया यादव आदींची उपस्थिती होती.तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांनी २०२४-२५ मध्ये कोणतीही करवाढ नसलेले ८२३ कोटी रुपयांचे आणि शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये १५ ते २० टक्के प्रमाणे यावर्षी तब्बल २९० कोटी रुपयांची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. शासकीय निधींचा आधार घेत यंदा १ हजार ११३ कोटी ५२ लाख ५६ हजार ७५३ रुपयांचे २०२५-२६ साठीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या अंदाजपत्रकात १ हजार ९४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. तर १९ कोटी ४० लाख रुपये शिल्लक अपेक्षित धरली आहे.

अंदाजपत्रकाची वैशिष्टे..प्रभारी आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, नागरिकांच्या सूचना विचार घेऊन यावर्षीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. शहर कसे वाढेल, नागरिकांना सुविधा कशा देता येतील, याचा विचार करून अंदाजपत्रक केले आहे. मर्यादित साधनांचा वापर करून वस्तुनिष्ठ व कोणतीही करवाढ नसलेले हे अंदाजपत्रक आहे.

अंदाजपत्रकातील ठळक बाबींमध्ये पर्यावरण अहवाल करणे, ड्रोनने वृक्षगणना, श्वान निर्बीजीकरण व निवारा केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, मॉडेल स्मार्ट स्कूल योजना, सफाई कर्मचाऱ्यांसाठी हजेरी शेड, प्रधानमंत्री ई-बससेवा, आदर्श शाळा व शिक्षक पुरस्कार योजना आदींचा समावेश केला आहे.

प्रशासनाने ब्ल्यू व ग्रीन बजेट तयार केले आहे. त्यामध्ये जलस्त्रोतांचा शाश्वत पद्धतीने आर्थिक विकास, लोकांचे जीवनमान उंचावणे यासह रोजगार निर्मितीचा समावेशासह ‘ब्ल्यू इकॉनॉमी’वर भर दिला आहे. तर जीवाश्म इंधनांपासून अक्षय ऊर्जेकडे होणारे स्थलांतर, वाढीव ऊर्जा कार्यक्षमता आदींचा ग्रीन बजेटमध्ये समावेश केला आहे.

टॅग्स :Sangliसांगली