शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक भिडले, सभापतींनी दोघांनाही सभागृहाबाहेर काढले

By शीतल पाटील | Updated: August 4, 2023 15:49 IST

स्थायी समितीचे सदस्य नसतानाही राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक सभा सुरू असताना आत शिरले

सांगली : स्थायी समितीचे सदस्य नसतानाही राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक सभा सुरू असताना आत शिरले आणि त्यांच्यात रस्त्याच्या कामावरून वाद पेटला. अखेर सभापती धीरज सूर्यवंशी यांनी दोघांनाही सभागृहाबाहेर काढले.स्थायी समितीची सभा सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अभिजित भोसले सभागृहात आले. त्यांनी खाॅजा वसाहत ते कोल्हापूर रोड या रस्त्याचे काम थांबविण्याची मागणी केली. हारगे सभागृहात गेल्याच कळताच नगरसेवक योगेंद्र थोरातही आले. त्यांनी वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.मिरजेतील खाँजा वसाहत ते कोल्हापूर रोड या रस्त्यासाठी थोरात यांनी समाजकल्याण निधीतून ५० लाख मंजूर केले आहेत. तर हारगे यांच्या पत्नी नगरसेविका संगीता हारगे यांनी अंदाजपत्रकात निधीची तरतुद केली आहे. दोघांनी आपल्याच निधीतून रस्ता व्हावा, यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यातून काही दिवसांपासून दोघांत वाद निर्माण झाला आहे.

या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना निविदा काढण्यात आली आल्याचा मुद्दा हारगे यांनी उचलून धरला आहे. तर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून चार दिवसांत रस्त्याच्या जागेला महापालिकेचे नाव लागणार असल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने या रस्त्याचा वादही चांगलाच पेटला आहे.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस